‘ऑनलाईन’ खेळांद्वारे अल्पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर केल्याचे प्रकरण
ठाणे, १२ जून (वार्ता.) – भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून अटक केली आहे. तो रहात असलेल्या मुंब्रा भागातील देवरीपाडा येथील शाजिया इमारतीमधील घरावर पोलिसांनी लक्ष ठेवले होते. त्याच्या आईलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पोलिसांनी शहानवाजचे अधिकोषाचे (बँकचे) खाते गोठवले होते. ठाणे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अलीबाग येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकून शहानवाज खान याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘त्याने मुलांचे धर्मांतर केले आहे का ?’, याची चौकशी करण्यासाठी त्याला गाझियाबाद पोलिसांच्या कह्यात देण्यात येणार असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.
ऑनलाइन गेमिंग एप फोर्टनाइट के जरिए युवाओं के धर्मांतरण के मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान उर्फ बद्दो (23) की आज कोर्ट में पेशी हुई। जिसके बाद उसे ट्रांजिट रिमांड के जरिए गाजियाबाद पुलिस के हाथ सौंपा गया। बद्दो को कल महाराष्ट्र की ठाणे पुलिस ने रायगढ़ जिले के अलीबाग में लॉज से… pic.twitter.com/9GEPh9TYBJ
— Punjab Kesari-UP/UK (@UPkesari) June 12, 2023