आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात मांस आणि मटण विक्रीस बंदी !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी, म्हणजे  (१७ जुलै २०२४) मोठ्या प्रमाणात भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. त्या पार्श्‍वभूमीवर १६ ते २० जुलै २०२४  या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री आणि गोवंशियांची हत्या, यांवर बंदी घालण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिला.

संपादकीय भूमिका

केवळ यात्रा कालावधीतच नको, तर पंढरपूरसह महाराष्ट्रातील सर्वच तीर्थक्षेत्रे आणि देवस्थाने यांच्या परिसरात अशी बंदी कायमस्वरूपी हवी !