सहस्रो वर्षांपूर्वी वास्तूशास्त्राचा इतका सखोल अभ्यास करणारा महान हिंदु धर्म !

‘वास्तूरचना करणे हे अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचे कार्य आहे. अनेक गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास, नैसर्गिक वातावरण, भूप्रदेश, तसेच वास्तूमालकाच्या आवश्यकता यांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच एखाद्या वास्तूचा आराखडा, ठराविक जागेवर विशिष्ट पद्धतीने बांधण्याचा विचार केला जातो. या प्रक्रियेत एक मूळ संकल्पना असते; तसेच इतर बारकाव्यांविषयी सविस्तर संकल्पना असतात. सर्वसामान्य ज्ञान, अनुभव, आवड आणि आवश्यक तेव्हा योग्य ते कार्य करूनच वास्तूची निर्मिती होत असते; परंतु हे पुरेसे नाही. वास्तूशास्त्रानुसार सूर्यादी ग्रह, नक्षत्रे, पृथ्वी, तसेच अनेक ऊर्जास्रोतांचा वास्तूवर आणि वास्तू उपभोगल्यावर होणार्‍या इष्ट आणि अनिष्ट परिणाम यांचा संपूर्ण विचार करूनच इमारत बांधणे श्रेयस्कर आणि अंतिमतः समाजहिताचे असते.’

(दिशाचक्र,  पृ. ८०. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला.)