हिंदु धर्माच्या विरोधात निश्चितच मोठे षड्यंत्र कार्यरत आहे. हिंदु सनातन धर्म अतिशय पुरातन असून त्याला मानणारे लोक बहुसंख्य आहेत. हे काही धर्मविरोधकांना रूचत नसल्याने हिंदु धर्म संपुष्टात आणण्यासाठी चित्रपट आणि वेब सिरीज यांच्या माध्यमांतून हिंदूंच्या मनावर आघात करून त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी वाईट प्रतिमा निर्माण केली जात आहे. वेब सिरीजच्या माध्यमातूनही असाच प्रकार केला जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसेच स्वतःची कारकीर्द पुढे नेण्यासाठी काही जण अशा गोष्टी करत आहेत. अशा प्रत्येक व्यक्तीला विरोध करायला हवा. केंद्र सरकारकडे बहुमत आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे.