(म्हणे) ‘वादग्रस्त भागात बैठक घेण्यास आमचा विरोध !’

श्रीनगर येथे २२ ते २४ मे कालावधीत तिसरी ‘जी २०’च्या पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्यास चीनने नकार दिला आहे.

पंतप्रधान मोदी २८ मे या दिवशी करणार नव्या संसद भवनाचे उद्घाटन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २८ मे या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पां’तर्गत ही इमारत बांधण्यात आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ लवकरच धावणार !

लवकरच कोकण रेल्वे मार्गावरून ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ धावणार आहे. तिची चाचणी १६ मे या दिवशी घेण्यात आली. वर्ष २०२३ पर्यंत ७५ वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार आहेत.

कर्नाटकात आम्ही हरलो, तरी आमचा निवडून येण्याचा ‘रेट’ चांगला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कर्नाटकात आम्ही हरलो, तरी आमचा निवडून येण्याचा ‘रेट’ (वारंवारता) चांगला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

ब्रिटनमधून कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी भारताकडून हालचाली !

‘प्रत्यार्पण अभियान !’ भारतीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सांगितले की, या वस्तू भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार प्राधान्याने प्रयत्न करत आहे. या वस्तू आणि मूर्ती आणणे हे भारताच्या धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे.

कर्नाटकातील सत्तांतर !

मागील निवडणुकीत हिंदूंनी भाजपला ज्या विश्वासाने मते दिली, तो विश्वास भाजपने सार्थकी लावला नाही. त्यामुळे हिंदूंची मते विभागली गेली, तर हिजाब आणि अन्य सूत्रांमुळे भाजपला ‘खलनायक’ रंगवून काँग्रेस मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवण्यास यशस्वी झाली.

(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवत आहेत !’ – पाक अभिनेत्री सहर शिनवारी

पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !

(म्हणे) ‘निवडणुकीत धार्मिक प्रश्नाच्या आधारे वातावरण निर्माण करणे अयोग्य !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

भारतविरोधी धोरण चालवणार्‍या विदेशी शक्तींना अर्थमंत्री सीतारामन् यांचे सडेतोड प्रत्युत्तर !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विदेशात खोट्या बातम्यांच्या आधारावर भारतविरोधी धोरण (अजेंडा) चालवणार्‍या शक्तींना ते जेथून हे धोरण चालवत आहेत, तेथे जाऊन सडेतोड उत्तर देत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी त्यांच्या अमेरिका दौर्‍यात…

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी विशेष अतिथी !

पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍यामुळे सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन अन् महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्‍चित करून भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी पुढील टप्प्यात जाण्याची अपेक्षा आहे.