(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवत आहेत !’ – पाक अभिनेत्री सहर शिनवारी

भारतद्वेष नसानसांत भिनलेली पाक अभिनेत्री सहर शिनवारी!

पाक अभिनेत्री सहर शिनवारी

नवी देहली – पाक अभिनेत्री सहर शिनवारी हिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे, ‘मी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात देहली पोलिसांत तक्रार करणार आहे; कारण ते माझ्या पाकिस्तानमध्ये अराजकता आणि आतंकवाद पसरवत आहेत.’

देहली पोलिसांचे चोख प्रत्युत्तर !

सहर शिनवारी हिच्या ट्वीटवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना देहली पोलिसांनी म्हटले आहे, ‘आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद असतांना तुम्ही ट्वीट कसे काय करत आहात ?’ याखेरीज सहर शिनवारी हिच्या ट्वीटवर एका टि्वटर वापरकर्त्याने म्हटले आहे, ‘आम्ही पाकिस्तान भारतात विलीन करू आणि तुम्हाला चीनमध्ये पाठवू.’

संपादकीय भूमिका

पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !