१. २० ऑगस्ट २०१३ – हत्या झाल्याचा दिवस
अ. पुणे येथील महर्षि विठ्ठल शिंदे पुलावर सकाळी ७.२० वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मृतदेह आढळल्याचे आणि त्यांची हत्या झाल्याचे वृत्त प्रसारित !
आ. हत्येच्या घटनेनंतर ६ व्या मिनिटाला काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ‘हत्येमध्ये गोडसे प्रवृत्तीचा हात’ असे दिशाभूल करणारे आणि पूर्वग्रहदूषित विधान !
इ. पोलिसांनी आणलेल्या श्वानपथकातील श्वानाला मृत डॉ. दाभोलकर यांच्या चपलेचा वास दिल्यावर तो ते रहात असलेल्या घराच्या दिशेने जाण्याऐवजी ‘बालगंधर्व नाट्यगृहा’च्या दिशेने गेला, ही विशेष गोष्ट घडणे !
२. अंनिसकडून सनातन संस्थेने डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचा धादांत खोटा प्रचार चालू !
३. राजकीय क्षेत्र, पोलीस, प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी अशा विविध स्तरांतून केवळ सनातन संस्थेवर संशय घेण्यास आरंभ ! प्रसारमाध्यमांकडून रात्रंदिवस या घटनेविषयीच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ देणे चालू !
४. पोलिसांकडून सनातन संस्थेच्या साधकांची चौकशी
अ. सनातनचे पनवेल, गोवा आणि अन्य आश्रम येथे पोलिसांकडून चौकशी !
आ. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून श्री. संदीप शिंदे या साधकाला पुण्यात आणून त्याची पोलिसांकडून चौकशी !
इ. सनातनच्या ७०० साधकांची चौकशी !
ई. पोलिसांकडून दीड कोटी ‘कॉल रेकॉर्ड’ (संपर्क नोंदी) तपासल्याचा दावा !
उ. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार नोंदवणारे सनातनचे साधक श्री. राहुल कोल्हापुरे यांचा पोलिसांकडून चौकशीच्या नावाखाली छळ
५. तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी तपासात ‘प्लँचेट’द्वारे (मृताचा आत्मा बोलावण्याची एक पद्धत) ‘दाभोलकरांच्या आत्म्याने’ साहाय्य केल्याचा दावा करणारा ‘व्हिडिओ’ दाखवणारे ‘स्टिंग ऑपरेशन’ (नकळत केलेले चित्रीकरण) ‘आप’चे तत्कालीन नेते आशिष खेतान यांच्याकडून प्रसारित !
६. पुणे पोलिसांकडून अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे सुपुर्द !
७. हत्येच्या ४५ दिवसांनी आणि त्यानंतरच्या घटना
अ. शस्त्र बाळगणारे कुख्यात गुंड मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक करून त्यांच्याकडून हत्या झालेले पिस्तूल अन् गोळ्या कह्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
आ. ‘गुन्हा मान्य करण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाचे (‘ए.टी.एस्.’चे) तत्कालीन प्रमुख राकेश मारिया दबाव आणून २५ लाख रुपये देत आहेत’, असा मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांचा आरोप
इ. मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना जामीन; मात्र त्याला अंनिसचा विरोध नाही !
८. अन्वेषण सीबीआयकडे (केंद्रीय अन्वेषण विभागाकडे) सोपवण्याची उच्च न्यायालयात केतन तिरोडकर या पत्रकाराची याचिका !
९. मे २०१४
अ. न्यायालयाच्या आदेशानंतर ए.टी.एस्.कडून अन्वेषण काढून सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सुपुर्द !
आ. सीबीआयकडून सनातनचे साधक हेमंत शिंदे आणि नीलेश शिंदे यांची ‘ब्रेन मॅपिंग’ (सत्य वदवून घेणारी) चाचणी !
इ. सीबीआयने आरोपींची मूळ रेखाचित्रे पालटली.
ई. सीबीआयच्या आरोपपत्रात पुणे पोलिसांच्या तपासातील गुन्हेगारी स्वरूपातील अनेक खोट्या गोष्टी उघड ! (सीबीआयने हा नवीन तपास पुढच्या काळात सोडून दिला.)
१०. मे २०१४ ते जून २०१६
अ. १ जून २०१६ – सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे घर, तसेच सनातनचा आश्रम येथे सीबीआयची धाड
आ. १० जून २०१६ – डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक आणि पोलीस कोठडी
इ. १८ जून २०१६ – डॉ. तावडे यांना न्यायालयीन कोठडी
ई. २४ जून २०१६ – मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला ‘मिडिया ट्रायल’ चालवल्याविषयी चांगलेच फटकारले आणि ताशेरे ओढले.
११. सप्टेंबर २०१६ – डॉ. तावडे यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट
१२. डिसेंबर २०१६ – ‘पुंगळी आणि पिस्तुल यांच्या ‘फॉरेन्सिक’ तपासासाठी त्या गोष्टी ‘स्कॉटलँड यार्ड, इंग्लंड’ येथे पाठवायच्या आहेत’, असे सांगून सीबीआयचा बराच काळ संतापजनक वेळकाढूपणा
१३. सत्र न्यायालयाकडून डॉ. तावडे यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी सीबीआयला आदेश. या आदेशावर सीबीआयने मिळवली उच्च न्यायालयाची स्थगिती
१४. सीबीआय वेळकाढूपणा करत असल्याचे उच्च न्यायालयाचे ताशेरे
१५. पोलिसांच्या मते ‘सनातनचे साधक सारंग अकोलकर आणि विनय पवार हे हत्यारे, नियोजन केले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे’
१६. सप्टेंबर २०१६ ते ऑगस्ट २०१८ – अन्वेषणाच्या दृष्टीने काहीच झाले नाही.
१७. ऑगस्ट २०१८ – शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना अटक
१८. अवैधरित्या १८० दिवस कह्यात घेऊन कळसकर आणि अंदुरे यांच्यावर सीबीआयकडून आरोपपत्र प्रविष्ट
१९. सीबीआयकडून न्यायालयातील प्रत्येक सुनावणीला ‘या प्रकरणाचे अन्वेषण करू शकत नाही’, असे सांगण्यास आरंभ !
२०. मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआयच्या संचालकांची कानउघाडणी !
२१. डिसेंबर २०१८ – साक्षीदारांनी कळसकर आणि अंदुरे यांना छायाचित्रांवरून ओळखल्याचे सांगणे
२२. १८० दिवसांनंतर सीबीआयकडून कळसकर आणि अंदुरे यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट !
२३. एन्.आय.ए.कडे अन्वेषण सोपवण्याची अंनिसची मागणी केंद्र सरकारने फेटाळली.
२४. मुंबई उच्च न्यायालयाने ‘पसार आरोपींची संपत्ती जप्त करा, अर्थसाहाय्य शोधा’, असे सांगणे.
२५. आरोप निश्चितीच्या सुनावणीवर सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली !
२६. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरकांना मारेकरी घोषित करण्याचे आणि सनातनच्या अन्य पुणेरी ब्राह्मण साधकांना अटक करण्याचे सीबीआयचे षड्यंत्र वितरक हेमंत शिंदे, आरोपींचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातनचे साधक श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केले.
२७. मे २०१९ – आरोपींचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना पुरावे नष्ट करणे आणि दाभोलकर हत्येच्या षड्यंत्रात सहभागी असणे हे आरोप ठेवून अटक, तसेच सनातनचे साधक विक्रम भावे यांना अटक
२८. ५ जुलै २०१९ – अधिवक्ता पुनाळेकर यांना जामीन संमत
२९. वर्ष २०१९ – मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाची सुनावणी चालू करण्याची स्थगिती उठवली !
३०. वर्ष २०२० – ठाणे येथील खाडीत वर्ष २०१८ मध्ये सुटे भाग काढून टाकलेले पिस्तूल शोधण्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च करून, नॉर्वेवरून पाणबुडे आणून, दुबईच्या आस्थापनाला कंत्राट देऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या अनुमती घेऊन पिस्तूल शोधण्याचे सीबीआयचे अत्यंत संतापजनक कृत्य !
अखेर पाणबुड्यांनी खाडीच्या तळाशी एक अख्खे पिस्तूल शोधले. नंतर ‘हे पिस्तूल हत्येत वापरले गेले नव्हते’, असे सीबीआयने सांगितले.
३१. मे २०२१ – विक्रम भावे यांना जामीन संमत !
३२. सीबीआय आणि दाभोलकर कुटुंबीय यांच्याकडून दोघांच्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान !
३३. १४ सप्टेंबर २०२१ – डॉ. दाभोलकर प्रकरणाची सुनावणी चालू
३४. १५ सप्टेंबर २०२१ – सरतेशेवटी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर या ५ जणांवर आरोप निश्चित !
३५. वर्ष २०२२ आणि २०२३ – अंदुरे आणि कळसकर यांना ओळखल्याची साक्षीदाराची साक्ष
३६. ३० जानेवारी २०२३ – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण !
३७. ४ जानेवारी २०२४ – सर्वोच्च न्यायालयाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अधिवक्ता पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या जामिनाच्या विरोधातील याचिका फेटाळली !
३८. २९ फेब्रुवारी २०२४ – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अंतिम युक्तीवादाला आरंभ !
३९. १० मे २०२४ – सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना न्यायालयाकडून निर्दाेष घोषित, तर सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची आणि ५ लाख रुपये दंडाची शिक्षा घोषित.