मुंबई – देशात इंधनाच्या दरात सतत वाढ चालू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. देशातील ६ राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती न्यून झाल्या असतांनाही केंद्र सरकारने त्याचा पुरेसा लाभ देशातील ग्राहकांना मिळू दिला नाही. उत्पादन शुल्कामध्ये वाढ करून केंद्र सरकारने ग्राहकांची लूट केली आहे, असा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ‘ट्वीट’द्वारे केला आहे. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील इंधनाच्या किमती चव्हाण यांनी ‘ट्वीट’मध्ये पोस्ट केल्या आहेत.