माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

प्रशासकीय अधिकार्‍याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन आरोपीला प्रौढ आरोपी म्हणून दाखवणार्‍या पोलीस निरीक्षकाची चौकशी करा !

अशा पोलिसांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या गुन्ह्यांचे अन्वेषण केले, त्या सर्वच गुन्ह्यांचे न्यायालयाच्या निरीक्षणाखाली फेरअन्वेषण करून अशा खाकीतील खंडणीखोरांना कठोर शिक्षा केली, तरच इतरांना जरब बसेल.

आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल आणि गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या !

गणेशोत्सवाच्या वेळी शिंदे आणि शिवसेना गटांत येथील प्रभादेवी येथे हाणामारी झाली होती. या वेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी २ वेळा गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता चौकशीला प्रारंभ केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने ‘वाटाघाटी’ केल्याने ‘वेदांता आणि फॉक्सकॉन’  प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला ! – भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा घणाघात

सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प राज्यात राबवण्याविषयी नव्हे, तर अडीच वर्षे आस्थापनाच्या ‘वाटाघाटी’साठी प्रयत्न चालू केले.

१ लाख तरुणांना रोजगार मिळणार नाही, याचे दायित्व कुणाचे ? – आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणे, हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारे आहे. यामुळे १ लाख तरुणांना रोजगार मिळणार नाही. याचे दायित्व कुणाचे ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे आमदार आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी १४ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप !

वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात होणारा १ लाख ६६ सहस्र कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय या उद्योगसमूहाने घेतला आहे. गुजरात राज्यातील कर्णावतीजवळील ढोलेरा येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्यासाठी अधिसूचना घोषित

हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

परस्पर निर्णय दिल्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना जाब विचारला !

यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करावी, परस्पर घोषणा करू नये, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली.

ईश्वराची अर्चना समजूनच कलाकारांनी कलेचे सादरीकरण करावे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

कलेच्या सादरीकरणाद्वारे समाजातील अनेकांच्या तोंडवळ्यावर हसू आणणे, हे ईश्वरी कार्य आहे. ईश्वराची अर्चना समजूनच कलाकारांनी कलेचे सादरीकरण करावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

राजकीय घोळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे विश्‍वस्त मंडळ अंतत: विसर्जित !

हिंदूंच्या मंदिरांच्या विश्‍वस्त मंडळांवर राजकीय पक्षांचे नेते अथवा प्रशासकीय अधिकारी नकोत, तर भक्तच हवेत ! यासाठी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित होणे आवश्यक आहे.