पारंपरिक पोशाखातील महिलांना समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या बाटल्यांसह दाखवलेले ‘जहाँ चार यार’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह पोस्टर प्रदर्शित !

भारतीय कुटुंबव्यवस्थेवर आघात करणारेे आणि चंगळवादाला प्रोत्साहन देणारे असे चित्रपट भारतियांनी स्वत:चे पैस व्यय करून का पहावे ?

भारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा ! – हिंदु जनजागृती समिती

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने शंकराचार्यांचा यशोचित सन्मान करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

हिंदी चित्रपटसृष्टीची स्थिती दयनीय ! – चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आजकाल गुटखा विकत आहेत. त्यांना मोकळा वेळ मिळाला की, ते काही विनोदी किंवा अन्य विषयांवर चित्रपट बनवतात. ५-६ चित्रपट अपयशी ठरल्यानंतरही त्यांना काही फरक पडत नाही. ही खरोखरच दयनीय स्थिती आहे.

चर्चद्वारे संचलित सर्व आश्रयकेंद्रांची नियमित चौकशी आणि पहाणी करा ! – अनिल धीर, राष्ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ‘चर्चद्वारे संचलित आश्रयकेंद्रे कि अत्याचार केंद्रे ?’

श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटीची स्वच्छता !

या वेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि इतर असे ४०० सभासद, एन्.सी.सी. मधील १ सहस्र ५०० मुले-मुली अन् अधिकारी, असे एकूण अनुमाने २ सहस्र सभासद सहभागी झाले होते.

मुंबईतील टॅक्सीचालकांची भाडेवाढीसाठी बेमुदत संपाची चेतावणी !

भाडेवाढीच्या संदर्भात टॅक्सीचालक संघटना आणि सरकार यांच्यामध्ये अनेकदा चर्चा झाल्या; मात्र याविषयी सरकारने निर्णय न घेतल्याने अखेर टॅक्सीचालक संघटनांनी संपाचा निर्णय घेतला आहे

खारघर येथे शाळेच्या बसला आग !

आग लागण्यापूर्वीच चालकाने सर्व विद्यार्थ्यांना बसमधून उतरवल्याने सुदैवाने या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.

मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत व्याख्यानांतून धर्मशिक्षणासह हिंदूसंघटन अन् प्रथमोपचार यांविषयी प्रबोधन !

काही ठिकाणी श्री गणेशाचा सामूहिक नामजपही घेण्यात आला, तर काही ठिकाणी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. नवी मुंबईमध्ये ३ ठिकाणी ‘प्रथमोपचार’ या विषयावर व्याख्याने घेण्यात आली.

विद्यार्थ्याला दारू पाजून पँटमध्ये लघवी करण्याची बळजोरी करणार्‍या ४ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद !

अशा प्रकारे छळ करणारी ही भावी पिढी देशाचे भविष्य उज्ज्वल कसे करणार ?

संभाजीनगर येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर येथे सभा आहे.