मनसे ‘रझाकार’ आणि ‘सजाकार’ या दोघांचा बंदोबस्त करेल !  

‘मराठवाडा मुक्तीसंग्रामा’चा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा महाराष्ट्राने अन् मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.

मुंबईत भरदिवसा मुलीचे अपहरण आणि बलात्कार !

देशाच्या आर्थिक राजधानीत भरदिवसा मुलींचे अपहरण होणे, म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे कोणतेही भय राहिले नसल्याचेच लक्षण !

मुंबई येथे आजपासून पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ४१५ ठिकाणी विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन !

१७ सप्टेंबरपासून ४१५ ठिकाणी विनामूल्य ‘आरोग्य शिबिरां’चे आयोजन करण्यात आले आहे, तरी नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी केले आहे.

भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी ५ नेत्यांची नियुक्ती !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी १५ सप्टेंबर या दिवशी भाजपच्या ५ नेत्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

राज्यातील ४७० गावांमध्ये लंपी रोगाचा संसर्ग !

महाराष्ट्रातील जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, सातारा, बुलढाणा, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांतील ६४ जनावरे लंपी आजारामुळे दगावली आहेत.

१८ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य आंदोलन !

गडदुर्गांच्या दृष्टीने स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी समस्त हिंदूंकडून आयोजन !

फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्याविषयी कर सवलती दिल्याचा कागदोपत्री पुरावा दाखवा ! – अधिवक्ता आशिष शेलार, भाजप

या प्रकरणी ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांची ‘पेंग्विन सेना’ भ्रम निर्माण करून मराठी माणसाशी थापेबाजी अन् गुजराती माणसाविषयी शत्रुत्व निर्माण करण्याचे काम करत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे सविस्तर अहवाल मागितला ! : सांगली येथे साधूंना झालेल्या मारहाणीचे प्रकरण

सांगली येथे साधूंना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे सविस्तर अहवाल मागितला आहे.

याकूब मेमनच्या कबरीविषयी वाद; परंतु औरंगजेब आणि अफझलखान यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाचा प्रश्‍न प्रलंबितच !

छत्रपती शिवरायांच्या काळात महाराष्ट्रावर आक्रमण करणारे औरंगजेब आणि अफझलखान या अतिरेक्यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

प्रशासकीय अधिकार्‍याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.