मुंबई – प्रशासकीय अधिकार्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
१४ सप्टेंबर या दिवशी न्यायालयाने बच्चू कडू यांना अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. ही सुनावणी झाल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना कह्यात घेतले होते. ३० मार्च २०१६ या दिवशी मंत्रालयामध्ये सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या प्रकरणी कर्मचार्यांनी ‘काम बंद’ करून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलन केले होते. या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशीचा आदेश देण्यात आला होता.