‘मुले पळवणारी टोळी कार्यरत आहे का ?’ याविषयी अन्वेषण चालू ! – विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, मुंबई

विवेक फणसळकर

मुंबई, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पादचारी मार्गावर झोपलेल्या ७१ दिवसांच्या नवजात हिंदु बालिकेला पळवून नेणार्‍या मोहम्मद मेमन या मुसलमानाला मुंबई पोलिसांनी १२ घंट्यांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी २७ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली. मोहम्मद आणि त्याची पत्नी या नवजात बालिकेची विक्री करणार होते. ‘यामागे मुले पळवणारी टोळी कार्यरत आहे का ?’ याविषयी अन्वेषण चालू असल्याचे फणसळकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, तसेच अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी अपहरण झालेल्या नवजात बालिकेसह तिची आई मनीषा शेखर याही उपस्थित होत्या. स्वत:च्या मुलीला तत्परतेने शोधून काढणार्‍या पोलिसांविषयी या वेळी मनीषा शेखर यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

याविषयी अधिक माहिती देतांना विवेक फणसळकर म्हणाले, ‘‘मनीषा शेखर या त्यांचे पती आणि ३ अल्पवयीन मुलींसह लोकमान्य टिळक टर्मिनस येथील प्रभात शौचालयाच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गावर झोपल्या असतांना २५ ऑक्टोबरच्या रात्री मेमन याने त्यामधील नवजात बालिकेला पळवून नेले. याविषयी २६ ऑक्टोबर या दिवशी बालिकेची आई मनीषा शेखर यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. बालिकेचा शोध घेण्यासाठी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांतील ८ पथके कार्यरत होती. त्यांना ‘सीसीटीव्ही’ चित्रणामुळे आरोपीचा शोध घेता आला. गुप्त पोलिसांच्या साहाय्याने ॲन्टॉप हिल या भागात पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले. यासाठी रेल्वे पोलिसांचे सहकार्य लाभले. आरोपी वडाळा येथे रहाणार असून त्याचा कीटकनाशक विक्रीचा व्यवसाय आहे. या प्रकरणात आणखी कुणी आरोपी आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.’’

संपादकीय भूमिका 

पोलिसांचे हे ‘वरातीमागून घोडे’ नव्हे का ? राज्यात ठिकठिकाणाहून मुली पळवण्याच्या घटना कितीतरी मोठ्या प्रमाणात गेली काही वर्षे पुढे येत आहेत. असे असतांना पोलिसांनी यापूर्वीच अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांना उद्ध्वस्त का केले नाही ? मुला-मुलींचे अपहरण करणार्‍या टोळ्यांचा संबंध थेट विदेशात असल्याचेही  समोर येत असतांना पोलीस प्रशासन एवढे निष्क्रीय का रहाते ?

२ मासांच्या बालिकेचे अपहरण करणार्‍या धर्मांध जोडप्याला वडाळा येथून अटक !

मुंबई – फोर्ट येथून २ मासांच्या बालिकेचे अपहरण करणार्‍या धर्मांध जोडप्याला १२ घंट्यांच्या आत पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद हानिफ इकबाल मेमन (४६), त्याची पत्नी आफरिन हानिफ इकबाल मेमन (३९)  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या बालिकेची विक्री करण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केल्याचे चौकशीत उघड झाले.

फोर्ट येथील एल्. टी. मार्गावरील सेंट झेविअर्स शाळेच्या समोरील पदपथावर मनीषा शेखर ही पती आणि तीन अल्पवयीन मुलींसह रहाते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही चित्रणाची पहाणी, प्रत्यक्ष घटनास्थळी चौकशी, पालकांचा पूर्वइतिहास, पूर्वी झालेल्या घटना, रेल्वे स्थानकावर चौकशी आदी पडताळणीसाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली होती. त्यानुसार वडाळा पूर्व येथे वास्तव्यास असलेला आरोपी मेमन याला कह्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा मान्य केला.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंच्या लहान मुलींनाही न सोडणारे धर्मांध !
  • देशभरात असलेल्या मुलींच्या अपहरणामागे जगभरातील धर्मांधांचे काय षड्यंत्र आहे, ते देशातील पोलीस प्रशासनाने उघड करून ते उद्ध्वस्त केले पाहिजे !