
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या वर्ष २०२३-२५ या द्विवार्षिक कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून दैनिक ‘आपलं महानगर’चे प्रतिनिधी श्री. मारुति मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबई महापालिका पत्रकार कक्षात ही निवडणूक पार पडली.
श्री. मारुति मोरे हे मुंबई महापालिका मुख्यालयात गेल्या २२ वर्षांपासून वृत्तसंकलन करीत आहेत. त्यांचे माजी महापौर, सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, अधिकारी वर्ग यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या प्रेमळ, मनमिळावू, सहकार्यासाठी तत्पर या वृत्तीमुळे वार्ताहर संघातील बहुतांश पत्रकारांनी त्यांना अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची विनंती स्वतःहून केली.

या निवडणुकीत उपाध्यक्षपदी श्री. सचिन धानजी (हिंदुस्थान पोस्ट), श्री. दिनेश सिंह (दैनिक हमारा महानगर), सरचिटणीसपदी श्री. राजेश सावंत (दैनिक पुढारी), सहचिटणीसपदी श्री. अजय जाधव ( ई टीव्ही भारत) आणि श्री. हेमंत साटम (दैनिक महाराष्ट्र टाइम्स) यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !