नवी मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – दुसर्या राज्यातील ‘आंबा’ हा महाराष्ट्रातील हापूस आंबा असल्याचे सांगून विक्री केल्यास व्यापार्यांवर कारवाई करू, अशी चेतावणी ‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती’तील फळ बाजाराच्या उपसचिवांनी दिली आहे. याविषयी ‘दि फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट असोसिएशन’ यांनाही पत्र पाठवले आहे.
बाजार समिती आणि अन्न अन् औषध प्रशासन यांच्या अधिकार्यांनी वारंवार कारवाई केल्याने याला काही प्रमाणात आळा बसला आहे. असे असले, तरी अद्यापही काही प्रमाणात फसवणुकीचे प्रकार चालूच आहेत, असे समितीच्या निदर्शनास आले आहे.