महाराष्ट्रासाठी बारसू येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आम्हाला हा विषय प्रतिष्ठेचा करायचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची आमची सिद्धता आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल.

(म्हणे) ‘राष्ट्र’ आणि ‘धर्म’ संकल्पना नष्ट व्हाव्यात ! – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक

सर्व संकल्पनांविषयी गोंधळ असलेल्या अशा मराठी साहित्यिकांमुळे समाजाला दिशा मिळण्याऐवजी समाजाचा वैचारिक गोंधळच वाढला आहे, असे म्हटले तर चूक ठरू नये !

शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील सर्व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून दिल्या जाणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून यावर कार्यवाही होणार आहे.

मुंबईमध्‍ये खंडणीसाठी व्‍यावसायिकाचे अपहरण करणार्‍या ७ जणांना अटक !

व्‍यावसायिक भागीदारीतून निर्माण झालेल्‍या वादातून २४ एप्रिल या दिवशी हे अपहरण करण्‍यात आले होते. पोलिसांनी १३ घंट्यांमध्‍ये शेट्टी यांची सुटका केली.

राज्‍यातील सर्व शासकीय ध्‍वजारोहणाच्‍या ठिकाणी अल्‍पोपहाराची व्‍यवस्‍था !

महाराष्ट्र भूषण पुरस्‍कारा’च्‍या सोहळ्‍यात उष्‍माघातामुळे १४ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी जिल्‍हाधिकार्‍यांना सूचना दिली.

‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार सोहळ्‍यातील मृत्‍यूंची उच्‍चस्‍तरीय चौकशी करा !

खारघर येथे झालेल्‍या ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार वितरण सोहळ्‍याला उपस्‍थित भाविकांतील १४ जणांचा मृत्‍यू झाला होता. याचे अन्‍वेषण करण्‍यासाठी सरकारने एक समिती गठीत केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईत तक्रार प्रविष्ट !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले.

मालकिणीची हत्या करणारी धर्मांध महिला तिचा पती आणि मुलगा यांच्यासह अटकेत !

मालाड (मुंबई) येथील घटना !
२५ वर्षे घरात आश्रय देऊन, तसेच पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करूनही घात !
सोन्याची साखळी, भ्रमणभाष आणि स्मार्ट वॉच यांची चोरी !

मॉरिशस येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मॉरिशस येथे लोकार्पण करण्यात येणार आहे. २८ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर ताण निर्माण होईल !

भेंडवळ येथे घटमांडणी करून भविष्य वर्तवण्याची परंपरा ३५० वर्षे जुनी आहे. ही भविष्यवाणी शेतकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडली.