मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले. ‘जयंतीच्या दिवशी पुरुष मंडळी दारू पिण्यासाठी गेली’, असे ते बोलल्याचे एका ध्वनीचित्रफीतीतून उघड झाले. त्यांच्या या विधानाच्या विरोधात २४ एप्रिल या दिवशी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून ‘आव्हाड यांनी तात्काळ याबाबत जनतेची क्षमा मागावी’, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांनी केली आहे.