मालकिणीची हत्या करणारी धर्मांध महिला तिचा पती आणि मुलगा यांच्यासह अटकेत !

  • मालाड (मुंबई) येथील घटना !

  • २५ वर्षे घरात आश्रय देऊन, तसेच पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करूनही घात !

  • सोन्याची साखळी, भ्रमणभाष आणि स्मार्ट वॉच यांची चोरी !

मुंबई – २५ वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर भीक मागणार्‍या शबनम प्रवीण उपाख्य महंमद उमेर शेख हिला डिकोस्टा नावाच्या महिलेने स्वतःच्या घरी आणून तिला काम दिले, तसेच पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला. तिचे लग्नही लावून दिले; पण तिने भ्रमणभाष आणि सोन्याची साखळी यांसाठी डिकोस्टा यांचीच हत्या केल्याची घटना  मालाड परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी शबनम प्रवीण उपाख्य महंमद उमेर शेख, पती महंमद उमेर इब्राहिम शेख आणि मुलगा महंमद शहजाद उमेर शेख यांना अटक करण्यात आली आहे.

मालकिणीकडे (डिकोस्टा यांच्याकडे) भरपूर पैसे असल्याचे शबनमला वाटायचे. त्यामुळे तिने मालकिणीच्याच घरात लूट करण्याचे ठरवले. मुलगा आणि पती यांच्या साहाय्याने तिने चोरीचा कट रचला. डिकोस्टा यांचा नातू कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधत तिघांनी मिळून मालकिणीला स्नानगृहातील पाण्याच्या बादलीत बुडवून मारले. मालकिणीची सोन्याची साखळी, भ्रमणभाष आणि स्मार्ट वॉच घेऊन ते पळून गेले.

या कालावधीत डिकोस्टा यांचा नातू सतत त्यांना फोन करत होता; मात्र त्या भ्रमणभाष उचलत नसल्याने त्याने शेजारी संपर्क केला. शेजारच्यांनी घरात येऊन पाहिल्यावर घडलेला प्रकार समजला. पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळल्यावर शबनम संशयितरित्या इमारतीतून बाहेर पडतांना दिसली. पोलिसांनी तिला कह्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. त्यात तिने पती आणि मुलगा यांच्या साहाय्याने चोरी केल्याचे मान्य केले.

संपादकीय भूमिका

धर्मांधांचे खरे स्वरूप जाणा आणि त्यांना घरात आश्रय द्यायचा कि नाही ?, ते ठरवा !