उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची मोर्चा काढून मागणी
गोंडा (उत्तरप्रदेश) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून या दिवशी अयोध्येच्या दौर्यावर जाणार आहेत; मात्र त्यांच्या दौर्याला येथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. येथे त्यांनी काढलेल्या मोर्च्यामध्ये साधू, संत आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी सिंह यांनी ‘राज ठाकरे यांनी उत्तर भारतियांची क्षमा मागितल्याविना त्यांना उत्तरप्रदेशमध्ये येऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे. काही वर्षांपासून राज ठाकरे यांनी उत्तर भारतियांच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलन केले होते. त्या वेळी त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने करण्यासह त्यांना मारहाण केल्याचा दावा करत सिंह यांनी ही मागणी केली आहे.
Will not allow #RajThackeray, who humiliates North Indians, to enter the border of #Ayodhya: UP BJP MPhttps://t.co/aC3hOW5RgZ
— TIMES NOW (@TimesNow) May 5, 2022
सिंह म्हणाले की, राज ठाकरे उंदीर आहेत. पहिल्यांदा राज्यातून बाहेर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मी आदर्श मानतो. माझा राज ठाकरे यांना विरोध आहे, मराठ्यांना नाही, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.