इच्छित कार्य शुभ मुहूर्तावर करण्याचे महत्त्व

‘भारतात प्राचीन काळापासून महत्त्वाचे कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मुहूर्तांचा संबंध वेळोवेळी येतो. ‘मुहूर्त’ या विषयाची प्राथमिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.

( फल ) ज्योतिषशास्त्राकडे भारतीय दृष्टीकोनातून पहाण्याची आवश्यकता !

ज्योतिषशास्त्राला विरोध करणारे अनेक जण वैयक्तिक जीवनात ज्योतिषांचा सल्ला घेतात, त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता भारतीय शास्त्रांमागील विज्ञान जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे, हा खरा बुद्धीवाद ठरेल.

तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत

भारतात तिथीचा उपयोग व्यवहारात न होता केवळ धार्मिक कार्यांसाठी होतो. प्रस्तुत लेखाद्वारे तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत समजून घेऊया.

जन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व समजून घ्या !

‘बाळाचा जन्म झाल्यावर ज्योतिषाकडून बाळाची जन्मपत्रिका बनवून घेतली जाते. अनेकांना पत्रिकेत काय माहिती असते, याविषयी उत्सुकता असते. या लेखाद्वारे ‘जन्मपत्रिका म्हणजे काय ? आणि पत्रिकेत कोणती माहिती अंतर्भूत असते ?’, याविषयी समजून घेऊया. 

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. मनुष्यजन्माचा उद्देश लक्षात आल्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो.

मंगळदोष – समज आणि गैरसमज

मंगळदोषाविषयी समाजात अपसमज असल्याचे दिसून येते, तथापि आता त्याचे प्रमाण न्यून होत आहे. मंगळदोषासंबंधी समज आणि गैरसमज या लेखाद्वारे समजून घेऊया.

विवाह निश्‍चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व !

बुद्धीला कळण्यास कठीण असणार्‍या काही गोष्टी, उदा. व्यक्तीच्या प्रारब्धाची तीव्रता, व्यक्तीला असणारा सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादींचा बोध जन्मकुंडलीद्वारे होतो.

अशुभ काळात जन्म झालेल्या शिशूची ‘जननशांती’ करणे का आवश्यक आहे ?

नवजात शिशूच्या संदर्भात दोष-निवारणासाठी केल्या जाणार्‍या धार्मिक विधीला ‘जननशांती’ म्हणतात. नवजात शिशूला अशुभ काळात जन्म झाल्यामुळे किंवा विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यामुळे दोष लागतो. याविषयी अधिक माहिती समजून घेऊया.

आज कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही !

कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग येतो. या दिवशी स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते. परंतू या वर्षी ७ नोव्हेंबरला स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही; का ?,ते पहा.

नवजात शिशूचे नाव धर्मशास्त्रानुसार ठेवा !

नवजात शिशूच्या नावासंबंधी ऋषिमुनींनी सखोल विचार केला असल्याने यावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते !