अग्नीशामक तपासणीच्या (फायर ऑडिट) प्रतिक्षेत जिल्हा शासकीय रुग्णालय !

गत एक तप सातारा जिल्हा रुग्णालयाची अग्नीशामक तपासणी (फायर ऑडिट) झाले नसल्याची गोष्ट समोर आली आहे. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय अग्नीशामक तपासणीच्या (फायर ऑडिट) प्रतिक्षेत असल्याची माहिती आहे.

अग्नीशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव कार्यालयातून पुढे गेला नसल्याचे उघड

भंडारा येथील रुग्णालयात ‘इनक्युबेटर’जवळ नर्स असणे बंधनकारक असतांना ही घटना घडली तेव्हा नर्स या कक्षात नसल्याची माहिती पुढे येत आहे.

दिवसाला ६०० जणांचे लसीकरण करणार – पालकमंत्री

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील ९ सहस्र ४३४ आधुनिक वैद्य, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गोवा राज्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांतील १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर दिली.

भंडारा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे

‘‘या वेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चौकशी समिती चौकशी करत आहे. एका मासात या समितीचा अहवाल येईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.’’

नवजातांचे मारेकरी कोण ?

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता विभागातील ‘शिशु केअर युनिट’मध्ये लागलेल्या भीषण आगीत १० बाळांचा मृत्यू झाला. आगीत झालेल्या या हानीमुळे देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती या सर्वांनाच धक्का बसला आहे.

गोव्यात कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता

देशासमवेत गोव्यातही कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता असून लसीकरणासाठी राज्यातील ८ रुग्णालये निवडण्यात आली आहेत.

कोरोनाविषयक चाचण्यांच्या दराविषयी अधिसूचना लागू

कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचण्यांचे दर शासनाने अधिसूचनेद्वारे घोषित केले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी हे दर समान असतील. पूर्ण स्वयंचलित ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी २ सहस्र ४३० रुपये आकारले जातील.

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

भंडारा येथे नवजात शिशू केअर युनिटमध्ये शॉटसर्किटमुळे आग, १० नवजात बालकांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे.