संभाजीनगर येथे रुग्ण घटल्याने महापालिकेचे १८ पैकी ५ कोविड केअर सेंटर रिकामे !

५ कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही.

संभाजीनगर – महापालिकेने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात १८ कोविड सेंटर चालू केले होते. मार्चअखेरीस आणि एप्रिलच्या पहिल्या २ आठवड्यांपर्यंत येथे रुग्णांना खाट मिळण्यासाठी धडपड करावी लागायची; मात्र आता दळणवळण बंदी आणि वाढते लसीकरण या योजनांमुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू घटू लागली आहे. त्यामुळे १८ पैकी ५ कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. महापालिकेने एकूण ३ सहस्र ६८९ रुग्णांची व्यवस्था केली होती. यापैकी २ सहस्र ४२ खाट सध्या रिक्त आहेत, तर केवळ १ सहस्र ६४४ जणांवरच उपचार करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.