रेमडेसिविरसाठी नातेवाइकांनी काळाबाजार करणार्‍यांच्या आमीषाला बळी पडू नये ! – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक

   

 पुणे, २८ एप्रिल – कोरोनारुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयातच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या औषधाचा समावेश जीवनावश्यक गरजेच्या सूचीत करण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून याचा पुरवठा थेट रुग्णालयांना केला जात आहे. यामुळे नातेवाइकांनी बाहेर कोठेहे इंजेक्शन घेऊ नये आणि काळाबाजार करणार्‍यांच्या आमीषाला बळी पडू नये, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. तसेच कोणी चढ्या दराने इंजेक्शनची विक्री करत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असेसुद्धा सांगितले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍यांवर नुकतीच कारवाई करून ३ जणांना अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक देशमुख यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे.