सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी ते आसनस्थ असलेल्या रथात साधिकेला विठ्ठलाचे दर्शन होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आसनस्थ झालेला रथ पटांगणात येत असतांना मला ‘तो रथ वैकुंठलोकातून हळूहळू खाली भूमीवर येत आहे’, असे वाटत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘रथात साक्षात् विठ्ठल उभा आहे. मी पंढरपूरला असून वारीतील रिंगण चालू आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त येणार्‍या साधकांची निवासव्यवस्था स्वतःच्या घरी भावपूर्ण करतांना आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘जेव्हा मला सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून समजले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अन्य जिल्ह्यातील साधक आमच्या ‘हॉटेल गुरुप्रसाद’ (विश्रामगृह) येथे येणार आहेत, तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘दुपारी १.३० ते अनुमाने ५ – ६ वाजेपर्यंत रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा असायची. माझे पाय दुखतात आणि मला अन्य शारीरिक अडचणी आहेत. मी पाहुण्यांना आश्रम दाखवत असतांना देहभान विसरायचे. त्यामुळे माझ्या शारीरिक दुखण्याकडे माझे लक्ष जात नसे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आळवल्यावर दोन्ही डोळ्यांतील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म सहजतेने होणे

९.६.२०२३ या दिवशी ‘प.पू. डॉक्टरच माझा हात धरून मला शस्त्रकर्मकक्षात घेऊन जात आहेत’, असे मला वाटले. शस्त्रकर्मकक्षात प.पू. डॉक्टरांसारखेच उंच आणि त्यांच्यासारखेच दिसणारे नेत्र शल्यकर्मतज्ञ पाहून मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच राहिलो. त्यांना पहातांना मी माझे देहभान विसरलो.

अध्यात्म हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठच !

‘विज्ञानाचे विषय मायेशी संबंधित असतात, तर अध्यात्माचे विषय ईश्वरप्राप्तीशी संबंधित असतात. याचा परिणाम म्हणजे विज्ञानामुळे मनुष्य मायेत अधिकाधिक अडकत जातो, तर अध्यात्म मायेतून सुटका करायला साहाय्य करते.’

धर्म विसरल्याने भारतातील हिंदूंना एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही !

‘भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यांच्या भाषा, चालीरिती निरनिराळ्या आहेत, तरी त्यांना ‘आपण एकच आहोत’, असे वाटण्याचे एकमेव कारण आहे हिंदु धर्म ! त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील साधिका कु. स्मितल भुजले !

कु. स्मितल भुजले यांच्या मनात काही दिवसांपासून स्वतःविषयी नकारात्मक विचार येत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात त्यांना दर्शन देऊन मार्गदर्शन केले. त्याविषयी त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

विज्ञानाचा एकमेव खरा उपयोग !

‘विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे’, हे विज्ञानामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही प्रमाणात तरी दाखवता येते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेत घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धतीतून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

मागील भागात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाहिल्या. या भागात या कार्यपद्धतींविषयी लिहून देतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दूरदृष्टीमुळे केवळ दूरवरच्या साधकांनाच नव्हे, तर समाजालाही कार्यात सहभागी होता येणे !

मागे वळून पाहिले, तर प्रभात फेरी काढायला शिकवणे, नामदिंडी काढणे, समाजाला एकत्र करायला शिकवणे, जाहीर सभा घेणे, प्रवचनांतून समाजात जाऊन भूमिका मांडायला शिकवणे, हे सर्व प.पू. डॉक्टरांनी समाजात जाऊन प्रवचने घ्यायला सांगून बोलायला शिकवणे, दैनिक, तसेच साप्ताहिकाच्या माध्यमातून विचार मांडून काही प्रशिक्षण यांद्वारे करून घेतले.’