प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘दुराग्रह आणि हट्टाने नाकारणे’, हे महापातकी अन् मोहग्रस्त पाश्चात्त्यांच्या तोंडी शोभून दिसते; परंतु ज्या हिंदूने मातेच्या दुधासह सनातन धर्माचे पान केले आहे, त्या हिंदूंच्या ओठाला त्यांचा (दुराग्रह आणि हट्टाने नाकारणे) स्पर्श ही अत्यंत शोचनीय आहे.
रानटी इंग्रजी शिक्षणाने परिणामकारकरित्या सनातन धर्म आणि संस्कृती विरोधात लावलेल्या विषवल्लीने आमच्या सनातन वृक्षाला सर्व बाजूंनी आच्छादून टाकले आहे.
सत्तेकरता, मतपेटी (व्होट बँक)करता आसुसलेल्या या दुष्ट यच्चयावत् राजकारण्यांनी आमचा भूतकाळ, सनातन धर्म आणि त्याची नाळच आमच्या पिढीपासून तोडून टाकली.
आमची मंदिरे मुसलमानांनी फोडली. आमची अस्मिता सिंहासारखी होती. आम्ही पुन्हा नवीन मंदिरे बांधली. शास्त्रे कंठस्थ करून रक्षण केली. इंग्रजांनी मंदिरे तोडली नाहीत. शास्त्रे जाळली नाहीत; पण इंग्रजी शिक्षण देऊन आम्हाला प्रज्ञाहत केले. त्यामुळे मंदिरांत जाण्याची आमची श्रद्धाच नाहीशी झाली. आमचे श्रुति, स्मृति, पुराणादि प्राचीन विद्यावैभव आम्हाला तुच्छ वाटू लागले. पश्चिमेच्या वळणाला आम्ही लागलो आणि आज असे शिक्षणाचे भ्रष्ट पर्याय स्वीकारून पौरूषहीन आणि प्रज्ञाहत झालो.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०२३)