अद्भुत रचना असलेले सम्राट राजा कृष्णदेवराय याचे विजयनगर !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘सम्राट राजा कृष्णदेवराय याच्या राजधानीचे शहर म्हणजे विजयनगर. या ठिकाणी हिंदु साम्राज्याने ३५० वर्षे अखंड हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण केले. या नगरीचे आताचे नाव ‘हंपी’ असे आहे. सम्राटाच्या कमल महालाला भूमीपासून छतापर्यंत सुवर्णाचा पत्रा जडवला होता. विरूपाक्ष आणि श्रीरामाचे भव्य मंदिर नगरीची शोभा वाढवत होते. श्रीराममंदिरातील रथयात्रेच्या वेळचा रथ, म्हणजे भव्य गरुडच होता. श्रीराममंदिराच्या भिंतीवर १० मीटर लांबीचे कोरीव पाषाण जडवलेले होते. त्यावर हिंदु पुराणातील अतीसुंदर प्रसंग कोरलेले होते. शृंगेरी मठाचे अधिपती विद्यारण्यस्वामी यांनी विजयनगरचे हिंदु साम्राज्य क्षत्रिय राजवंशाकरवी उभे केले.

ही राजनगरी तुंगभद्रेच्या दक्षिणेकडे आहे. ‘जगातील अत्यंत रमणीय नगरी’, असे तिचे वर्णन त्याकाळी परदेशी प्रवासी करत असत. या नगरीची रचना अद्भुत होती. या नगराच्या बाहेर एका बाहेर एक असे ७ परकोट (संरक्षक भिंत) होते. त्यांचे पुरुषभर उंचीचे दगड भूमीत असे घट्ट गाडले होते की, स्वार आणि शिपाई यांना ते सहज ओलांडता यायचे नाहीत. मुसलमानांच्या आक्रमणाने या नगरीचा विध्वंस झाला. आजही विजयनगरमधील विरूपाक्ष मंदिर आणि श्रीराममंदिर येथे लोक पूजा करतात.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जून २०२३)