पराक्रमी हिंदु राजांना साम्यवादी प्रणालीने स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. ‘चंद्रगुप्ताने अलेक्झांडर, त्या ग्रीकासमवेत पोरस यांचा सामना करून त्यांना देशाबाहेर हाकलले.

२. बॅक्टेरियाच्या ग्रीकांना पुष्यमित्राने तक्षशिलेच्याही पलीकडे हाकलले.

३. विक्रमादित्य आणि पुलकेशी शात्करणी यांनी शकांना शरण यायला भाग पाडले.

४. समुद्रगुप्ताने ‘यु एची’ लोकांना धुळीस मिळवले.

५. यशोधर्मा आणि श्रीहर्षाने हुणांना नेस्तनाबूत केले.

६. अनंतपाल आणि जयपाल यांनी महंमद गझनीच्या नाकीनऊ आणले.

७. पृथ्वीराजाने महंमद घोरीला देशाबाहेर हाकलले.

८. महंमद शाह अब्दालीशी सदाशिवरावने अनेक मराठेविरांसह जबरदस्त झुंज दिली.

या सगळ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा नव्हती का ? देशाभिमान नव्हता का ? कि ते आपल्या स्वार्थासाठीच लढले ? शतशः पराक्रमी हिंदु राजे, सहस्रशः सेनापती आणि लक्षावधी सैनिक बुद्धोत्तरकाळात परकियांशी विलक्षण झुंजले. त्यांनी रणांगणावर मृत्यू पत्करला. हे सगळे स्वार्थी होते का ? ब्रिटिशांचे अनुकरण करून साम्यवादी प्रणालीने आमच्या भारतियांनी त्यांना स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २००९)