आध्यात्मिक पातळी न्यून झालेल्या साधकांनो, ‘निराश न होता आपण साधनेत कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करा आणि इतरांचे साहाय्य घेऊन साधनेचे नेमकेपणाने प्रयत्न करा !

अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व असल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने अन् चिकाटीने करावेत. माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, या नकारात्मक विचारांत न अडकता सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करण्यातील आनंद घ्या !’

‘खरे संत कसे असतात आणि त्यांचा समाजाला होणारा लाभ’, याविषयी पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

लोभ किंवा आसक्ती यांमुळे मनुष्य दुःखी होणे; मात्र वैराग्य प्राप्त झालेले संत जगाच्या दृष्टीने वेडे असले, तरी त्यांच्यापाशीच ज्ञान असणे, तेच समाजाला सुखाचा ईश्वरी मार्ग दाखवत असणे.

ईश्वरी कृपेने मिळणारे अनमोल ज्ञानधन सनातनला अर्पण करणारे पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज !

पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा रामायणासारखे ग्रंथ आणि संतचरित्रे यांचा गाढा अभ्यास आहे. महाराजांना गेल्या काही वर्षांपासून ईश्वराकडून सूक्ष्मातून अध्यात्मातील विविध विषयांवर ज्ञानही मिळत आहे.

वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय

साधकांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर येणार्‍या शंकांचे निरसन करून आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करणार्‍या सर्वशक्तीमान गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरेच आहेत.

देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसारच्या साधनेतील व्यष्टी आढाव्याचे जाणवलेले महत्त्व आणि शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

जगात मनुष्याला सर्वांत मोठी भीती वाटत असेल, तर ती संकटांची आणि यमराजाच्या मृत्यूची; परंतु तो हा विचार करत नाही की, आपण पृथ्वीवर पूर्वकर्मांनुसार भोग भोगायला आलेलो आहोत.

वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेले सूत्र

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून देहली सेवाकेंद्रातील साधकांना अनमोल मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र पुढे दिले आहे.

वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

हिंदुत्वाचे कार्य करत असतांना मला आज साधनेचे महत्त्व कळले. आजपर्यंत मला ‘हिंदुत्वाचे कार्य करणे, म्हणजेच साधना आहे’, असे वाटायचे. हा विचार अयोग्य होता, हे आज लक्षात आले. यापुढे हिंदुत्वाचे कार्य करतांना साधनेकडे लक्ष देईन.

चित्तशुद्धीसाठी एक वेगळा विचार !

प्रत्येक इंद्रियाकडून अयोग्य कृती न होण्याची दक्षता बाळगली तर ‘दम’ म्हणजे इंद्रियनिग्रह साधेल. पुढे हे अंगवळणी पडले की अयोग्य कृतीचा विचार मनात येताच तो चुकीचा असल्याचे भान होईल. ह्याने पुढची पायरी ‘शम’ अर्थात् मनोनिग्रह साधेल.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘प्रपंच केला, तरी मनस्ताप आहे आणि परमार्थ केला, तर मनस्ताप अधिक आहे; परंतु परमार्थ केल्याचे फळ मेल्यावर मिळते. जीव चांगल्या मार्गाला, देवांना भेटायला जातो आणि मुक्त होतो. जन्म-मृत्यूचे ८४ लक्ष फेरे चुकवतो.’