वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !
श्री. बिस्वा ज्योती नाथ, होजाई, आसाम : हिंदुत्वाचे कार्य करत असतांना मला आज साधनेचे महत्त्व कळले. आजपर्यंत मला ‘हिंदुत्वाचे कार्य करणे, म्हणजेच साधना आहे’, असे वाटायचे. हा विचार अयोग्य होता, हे आज लक्षात आले. यापुढे हिंदुत्वाचे कार्य करतांना साधनेकडे लक्ष देईन.
श्रीमती मीनाक्षी गुप्ता आणि श्री. सोबन सेनगुप्ता, बंगाल : परात्पर गुरुदेव यांनी प्रश्नांची नेमकेपणाने उत्तरे दिली आणि ती परिपूर्ण होती. त्यांचा सत्संग अनुभवण्याची संधी दिल्याविषयी आम्ही आभारी आहोत.
अधिवक्ता राजेश चौबे, बंगाल : आज परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन लाभले. त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो.
श्री. राहुल वर्मा, वाराणसी : गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळाल्याने जीवन धन्य झाले.
श्री. सतीश सेठ, सैदपूर, उत्तरप्रदेश : आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर ‘माझ्यातही पालट व्हावे’, असे वाटायला लागले. त्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन.