हे भगवंता, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत… !

  • हे भगवंता तुझ्यामुळेच आम्ही श्वास घेऊ शकतो !
  • श्वास घेण्यासाठी प्राणवायू तूच निर्माण केला आहेस !
  • हात आणि त्याची बोटे अशा प्रकारे निर्माण केली आहेस की, आम्ही सर्व प्रकारची कामे करू शकतो !
  • पायाची रचना आणि बोटे अशी दिली आहेस की, आम्ही चालू, पळू आणि बसू शकतो !
  • पाठीचा मणका दिल्यामुळे ताठ राहू शकतो आणि वाकूही शकतो !
  • आम्हाला पंचज्ञानेंद्रिये दिलीस म्हणून आमच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे !
  • जिभेमुळे आम्ही विविध चवींचा आनंद घेऊन तृप्ती अनुभवतो !
  • नेत्रांमुळे आम्ही सुंदर सृष्टीचा आनंद अनुभवू शकत आहोत !
  • भगवंताने निर्माण केलेले सुमधुर संगीत आणि समोरच्याचे बोलणे कानांनी ऐकू शकतो !
  • त्वचेमुळे आमच्या देहाचे रक्षण होते !
  • हृदय रक्त शुद्ध निर्माण करण्याचे कार्य अव्याहत करत आहे !
  • उदरातील सर्व रचनेमुळे अन्नपचन होते !
  • आम्ही खाल्लेल्या अन्नाच्या प्रत्येक कणाचे रक्त बनते, हे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे !
  • फुफ्फुस, मूत्राशय आदी सर्व अंतर्गत अवयव त्यांचे कार्य सुरळीतपणे करत असतात !
  • मेंदूतील विविध शाखांमध्ये असलेल्या असंख्य पेशींमुळे सर्व काही नियंत्रणात रहात आहे !