‘गुरुकृपायोग’ हा कलियुगांतर्गत कलियुगात जलद आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सांगितल्याविषयी अपार कृतज्ञता !

जिज्ञासूंना शीघ्र आध्यात्मिक उन्नती करता यावी, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कर्म, भक्ती आणि ज्ञान या योगमार्गांचा संगम असलेला ‘गुरुकृपायोग’ सांगितला. यामध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या अध्यात्मातील सिद्धांतानुसार, तसेच ४ वर्ण आणि ४ आश्रम यांनुसार, त्याचप्रमाणे स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया, भावजागृतीचे प्रयत्न, नाम, सेवा, सत्संग, त्याग, प्रीती आणि साक्षीभाव या टप्प्यांतून व्यष्टी अन् समष्टी साधना शिकवली जात असल्याने साधकाला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करता येणे शक्य होते. १५ जुलै २०२२ पर्यंत गुरुकृपायोगानुसार साधना करून ११९ साधक संत झाले, तर १ सहस्र ८६ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. या साधनामार्गाचे विदेशातील जिज्ञासूही आचरण करत असून त्यांचे जीवनही उद्धरत आहेत.

गुरुदेवा, आम्ही कृतज्ञ आहोत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
  • ‘मनुष्यजन्माचे ध्येय ईश्वरप्राप्ती’च आहे, हे शिकवल्याविषयी…
  • ‘जीवनातील दुःखाची ८० टक्के कारणे आध्यात्मिक असतात’, हे शिकवल्याविषयी…
  • ‘अध्यात्मात प्रगती करायची असते’, हे शिकवल्याविषयी…
  • ‘अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र आहे’, हे शिकवल्याविषयी…
  • ‘साधनेत कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे’ हे शिकवल्याविषयी…
  • ‘अध्यात्म हे स्पंदनशास्त्र आहे’, हे शिकवून स्पंदने ओळखण्यास शिकवत असल्याविषयी…
  • त्याग, संयम, शिस्त, नेतृत्व, नियोजन आदी गुण साधकांमध्ये निर्माण करत असल्याविषयी…
  • सर्वांवर प्रेम करता येण्यासाठी प्रयत्न करून घेत असल्याविषयी…
  • सगुणातून निर्गुणाकडे जाण्यास आणि व्यापक होण्यास शिकवत असल्याविषयी…
  • साधकांमध्ये स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे जाऊन सूक्ष्म ज्ञान मिळवता येण्याची क्षमता निर्माण केल्याविषयी…
  • साधकांच्या साधनेकडे व्यक्तीगत लक्ष देण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याच्या पद्धतीची निर्मिती केल्याविषयी… !
  • स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा यांनुसार टप्प्याटप्प्याने प्रयत्न केल्याने मनोलय अन् बुद्धीलय होऊन प्रगती होते, हे शिकवलेत !
  • दोष आणि अहं हे वाईट शक्तींचे प्रवेशद्वार आहेत, हे शिकवलेत !
  • दोष आणि अहं यांमुळे नकारात्मकता अन् काळ्या शक्तीचे आवरण वाढते आणि वातावरण रज-तमप्रधान होते, हे लक्षात आणून दिलेत !
  • ‘दोष आणि अहं यांच्या संदर्भात मनाचा खोलवर अभ्यास करून अन् स्वयंसूचना घेऊन ते कसे न्यून करायचे ?’, याचे मार्गदर्शन व्यष्टी आढावासेवकांच्या माध्यमातून केलेत !
  • क्षमायाचना, विविध प्रायश्चित्ते आणि शिक्षापद्धती या माध्यमांतून पापक्षालन करू शकतो, हे लक्षात आणून दिलेत !
  • ‘स्वतःला पालटणे म्हणजे साधना’ हे सांगितलेत !
  • संत आणि सद्गुरु यांचा अखंड सत्संग अन् मार्गदर्शन देऊन साधकांना चित्तशुद्धी करण्यासाठी साहाय्य केलेत !