अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झालेल्या बहुतांश वक्त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करून त्यांच्या व्याख्यानाला आरंभ केला. सर्वांमध्ये गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. आक्रमक हिंदुत्व अंगीकारणारे, वैचारिक प्रबोधन करणारे, राजकीय क्षेत्रात वावरणारे, अगदी नेपाळसारख्या विदेशात कार्य करणाऱ्यांनाही ‘प.पू. डॉक्टरांमुळे कार्य करू शकलो’, म्हणून गहिवरून येत होते. पूर्वी सनातनच्या साधकांव्यतिरिक्त कुणी प.पू. डॉक्टरांविषयी चांगले बोलले की, वाटायचे, ‘त्यांचा आपल्या प.पू. डॉक्टरांविषयी भाव आहे’. इतक्या जणांकडून त्यांचा भाव व्यक्त झाल्यानंतर वाटले, ‘प.पू. डॉक्टर केवळ सनातनचे नव्हे, तर सर्वांचे आहेत, विश्वव्यापक आहेत, अखिल ब्रह्मांडाचे आहेत.’
प.पू. डॉक्टरांनीही सर्वांनाच त्यांच्या पंखाखाली घेतले आहे. अडचणीच्या वेळी सनातनच्या साधकांचे साहाय्य देऊन, आध्यात्मिक ऊर्जा पुरवून सावरले आहे. हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या अगदी तळागाळातील कार्यकर्त्यालाही प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या चैतन्याद्वारे बांधून ठेवले आहे. ते पाहून वाटते, ‘देवा हे प्रेम कसे ?’
– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.