पत्नीला साधनेत पूर्ण सहकार्य करणारे आणि प्रत्येक प्रसंगात तिला आधार देणारे श्री. विनीत सोपान पाटील !

आम्ही दोघेही नोकरी करत असल्याने केवळ स्वयंपाक करतांना बोलायला वेळ मिळायचा; पण ते तक्रार न करता मला स्वयंपाकात साहाय्य करायचे. त्यात त्यांना कधी न्यूनता वाटली नाही.

विनयशील, स्वतःत पालट करण्याची तळमळ असलेले आणि भावपूर्णरित्या सेवा करणारे सोलापूर येथील श्री. विक्रम लोंढे !

दळणवळण बंदीमध्ये चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात श्री. विक्रम लोंढे सहभागी होतात. त्यांच्यात आधीपासूनच साधकत्व आहे. येथील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या कै. (श्रीमती) निर्मला अविनाश भावसार (वय ७३ वर्षे) !

चंदननगर, पुणे येथील श्रीमती निर्मला भावसार यांचे २९.९.२०२१ या दिवशी रात्री १२.१५ वाजता निधन झाले. त्यांची धाकटी सून सौ. शिल्पा आशुतोष भावसार आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् अनुभूती पुढे दिल्या आहेत.

तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही वडिलांच्या निधनाच्या प्रसंगी स्थिर राहून साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या पुणे येथील सुगम संगीत विशारद कु. मधुरा चतुर्भुज !

पुणे येथील साधक मोहन चतुर्भुज यांचे निधन झाले. त्यांची कन्या कु. मधुरा चतुर्भुज हिला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तरीही वडिलांच्या निधनाच्या कठीण प्रसंगाला ती स्थिरतेने आणि धैर्याने सामोरे गेली. त्या वेळी तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि तिच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

सात्त्विक गोष्टींची आवड असलेली येथील चि. अवनी अमित चिमलगी (वय १ वर्ष) हिच्या पहिल्या वाढदिवसाला तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

चि. अवनीची आई सौ. रश्मी चिमलगी यांना तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या  (कै.) श्रीमती प्रभा कानस्कर (वय ७९ वर्षे) !

९.१२.२०२१ या दिवशी कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर देवाज्ञा झाली. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.

विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश कांबळे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांच्या एका अनौपचारिक सत्संगात ही आनंदवार्ता दिली.

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर !

९.१२.२०२१ या दिवशी आईला (कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर) देवाज्ञा झाली. २२.१२.२०२१ या दिवशी तिच्या निधनानंतरचा चौदावा दिवस आहे. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.

संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीच्या शुभदिनी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली एक रणरागिणी ! धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ११ डिसेंबर २०२१ या दिवशी उत्तर महाराष्ट्र विभाग स्तरावरील ‘ऑनलाईन गुरुमहिमा’ सत्संगात ही घोषणा केली.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

प्रेमभाव, आध्यात्मिक प्रगल्भता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (वय १० वर्षे) !