सात्त्विक गोष्टींची आवड असलेली येथील चि. अवनी अमित चिमलगी (वय १ वर्ष) हिच्या पहिल्या वाढदिवसाला तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

सांगली – जन्मापासून सात्त्विक गोष्टींची आवड असणारी, नामजप ऐकल्यावर आनंदी होणारी चि. अवनी अमित चिमलगी ही महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची तिच्या पहिल्या वाढदिवसाला म्हणजेच १४ डिसेंबर २०२१ या दिवशी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. ही घोषणा सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना थोरात यांनी सौ. शीतल जोशी (चि. अवनीची आजी, आईची आई) यांच्या सांगली येथील घरी झालेल्या एका अनौपचारिक सत्संगात केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, चि. अवनीची आई सौ. रश्मी अमित चिमलगी, कु. अवनीची आजी सौ. शीतल जोशी, तसेच आजोबा श्री. शशिकांत जोशी हे उपस्थित होते.

चि. अवनी ही कोईम्बतूर, तमिळनाडू येथे वास्तव्यास असते. ती तिच्या आजीकडे सांगली येथे आल्यावर ही घोषणा करण्यात आली. या वेळी सौ. रश्मी चिमलगी आणि सौ. शितल जोशी यांनी चि. अवनीची गुणवैशिष्ट्ये सांगितली. सनातनच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. सुलभा कुलकर्णी यांनी कु. अवनीला प्रसाद आणि भेटवस्तू देऊन तिचा सत्कार केला.

चि. अवनी चिमलगी

चि. अवनीची आई सौ. रश्मी चिमलगी यांना तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गर्भधारणेपूर्वी

सौ. रश्मी चिमलगी

१ अ. ‘दुर्गा, दत्त आणि शिव’ यांच्या नामजपामुळे गर्भधारणेतील अडथळे दूर होऊन पंधरा दिवसांत गर्भधारणा झाल्याचे समजणे : ‘मार्च २०२० मध्ये दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर मी कोरोनासाठी (‘कोरोना महामारीवरील प्रतिबंधक उपाय म्हणून साधक ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’, असा नामजप प्रतिदिन १०८ वेळा करत होते.’ – संकलक) सांगितलेला नामजप करत होते. एक दिवस नामजपाला बसले असतांना मनात एक प्रश्न आला, ‘माझ्या विवाहाला तीन वर्षे झाली. आता मला बाळ केव्हा होईल ?’ तेव्हा आतून उत्तर आले, ‘आध्यात्मिक अडथळ्यांमुळे गर्भधारणा होत नाही; परंतु आता करत असलेल्या नामजपामुळे तो अडथळा दूर होऊन लवकरच तुझी गर्भधारणा होईल.’ त्यानंतर पुढील पंधरा दिवसात मला गर्भधारणा झाल्याचे समजले.

२. गर्भधारणेनंतर

२ अ. सांगितलेले सर्व आध्यात्मिक उपाय आणि नामजप पूर्ण करण्याचा उत्स्फूर्तपणे प्रयत्न होणे : गर्भावस्थेमध्ये असतांना माझ्या मनात सतत ‘नामजप आणि उपाय पूर्ण करूया’, असे विचार असायचे. माझ्याकडून उत्स्फूर्तपणे तसे प्रयत्न होत होते. मी प्रतिदिन पहाटे उठून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या सत्संगातील नामजप ऐकत असे आणि त्या नामजपातून मला चैतन्य मिळत असे.

२ आ. स्वप्नात श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु यांचे दर्शन होणे

१. ‘नववा मास चालू असतांना एकदा स्वप्नात भगवद्गीतेमधील एक चित्र माझ्या स्वप्नात आले. त्यामध्ये ‘श्रीकृष्ण रौद्र रूप घेऊन भीष्माला धडा शिकवत आहे’, असे मला दिसले.

२. आठव्या मासात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर माझ्या स्वप्नात आल्या होत्या. ‘त्या मला साधनेच्या संदर्भात काही सूत्रे सांगत आहेत’, असे मला दिसले.

३. त्यानंतर काही दिवसांनी मला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे स्वप्नात दिसले आणि ‘ते मला आमच्या घरातल्या जेवणाच्या पटलाजवळ आसंदीवर बसून आपत्काळाच्या संदर्भात काही सूत्रे सांगत आहेत’, असे मला दिसले.

२ इ. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मठातील महाप्रसाद ग्रहण करण्याची तीव्र इच्छा होणे आणि देवाच्या कृपेने कोईम्बतूर येथील श्री राघवेंद्र स्वामी मठामधे महाप्रसाद ग्रहण करता आल्याने इच्छा पूर्ण होणे : मला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मठातील महाप्रसाद ग्रहण करायची तीव्र इच्छा झाली; पण कोरोना दळणवळण बंदीमुळे गोंदवले येथे जाणे शक्य नव्हते; पण देवाच्या कृपेने सातव्या मासात कोईम्बतूर येथील श्री राघवेंद्र स्वामी मठामधे दर्शनाला गेले असता मला तेथील महाप्रसाद ग्रहण करता आला.

३. जन्मानंतर

आई (सौ. रश्मी चिमलगी) यांच्या कडेवरील चि. अवनी हिला प्रसाद देऊन तिचा सत्कार करतांना साधिका सौ. सुलभा कुलकर्णी (डावीकडे)

३ अ. देवाची आवड

१. अवनीला अंगाईगीतापेक्षा नामजप ऐकत झोपायला आवडते. तिला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत झोपवल्यास ती पटकन झोपते.

२. ती देवीकवच आणि बगलामुखी स्तोत्र लक्षपूर्वक ऐकते.

३. मी देवपूजा करायला प्रारंभ केल्यावर ती हातातील खेळणे टाकून पटकन देवघरात येते आणि पूजा संपेपर्यंत देवपूजा लक्षपूर्वक पहाते. तिला देवघरासमोर सतत जाऊन उभे रहाण्यास आवडते.

३ आ. तिला दूरचित्रवाणी पहायला आवडत नाही. दूरचित्रवाणी लावल्यास ती दुसरीकडे निघून जाते.

३ इ. आकलनक्षमता चांगली असणे : अवनीची आकलनक्षमता चांगली आहे. तिला एकदा शिकवलेले लवकर समजते. ती ‘विठ्ठल विठ्ठल’ ऐकल्यावर टाळ्या वाजवायला १ दिवसात शिकली.

४. चि. अवनीचे स्वभावदोष

हट्टीपणा, राग येणे

– सौ. रश्मी अमित चिमलगी (चि. अवनीची आई), कोईम्बतूर, तमिळनाडू. (५.१२.२०२१)

  • यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक