गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे डिचोली (गोवा) येथे २५ गोवंशियांना जीवदान

गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?

गोव्यात पावसाची विक्रमी नोंद

गोव्यात मागील २४ घंट्यांत पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. जून मासात यंदा पडलेला पाऊस हा मागील ५० वर्षांतील १० वा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान खात्याने २९ जून आणि ३० जून या दिवशी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गोव्यात समान नागरी कायदा चालतो, तर मग देशात का नाही ? – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. जात आणि धर्म यांच्या आधारे विभाजन होता कामा नये. गोव्यात एवढी वर्षे हा कायदा लागू असतांनाही गोव्यातील सर्व धर्मांच्या लोकांना काहीच अडचण निर्माण झालेली नाही.

गोवा : अबकारी घोटाळा प्रकरणी कारकुनासह २ निरीक्षक सेवेतून निलंबित

खात्यांतर्गत अन्वेषण चालू करून संबंधित वरिष्ठ कारकुनाला ११ लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले, तर उर्वरित २८ लाख रुपये पुढील २ दिवसांत वसूल केले जाणार असल्याचे अबकारी सूत्रांनी सांगितले.

(म्हणे) ‘कायदा-सुव्यवस्थेसाठी क्षमा मागितली; पण छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेतलेला नाही !’ – कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा, गोवा

‘‘मी मागितलेली क्षमा मनापासून नव्हती, तर ती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मागितली होती.’’ – सरपंच जोसेफ सिक्वेरा. अशा लोकप्रतिनिधींवर कधीतरी विश्वास ठेवता येईल का ?

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याचा प्रयत्न भक्तगणांनी सतर्कतेने हाणून पाडला !

हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?

कलम ३७० हटवूनही काश्‍मीरमध्‍ये हिंदू सुरक्षित नाहीत !- राहुल कौल, अध्‍यक्ष, यूथ फॉर पनून कश्‍मीर, पुणे

अद्यापही सरकार काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार मान्‍य करायला सिद्ध नाही. त्‍याचा परिणाम म्‍हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्‍मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्‍मीरमधील नरसंहार मान्‍य केला जात नाही, तोपर्यंत काश्‍मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्‍य नाही.

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे आज होणार उद्घाटन

कोकण रेल्वेमार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही अती जलद गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी गोवा येथून धावेल.

‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर उसगाव (गोवा) येथील पशूवधगृहाच्या परिसरात ५ दिवसांचा जमावबंदी आदेश लागू

‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?

गोवा : रुमडामळ येथे अनधिकृत गोमांसविक्री दुकान चालू करण्याच्या प्रयत्नामुळे पुन्हा तणाव

अनधिकृत गोमांस विक्री दुकान पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणार्‍याला  वेळीच रोखणार्‍या रुमडामळ येथील जागरूक नागरिकाचे अभिनंदन !