Goa LateNight Sound Pollution : मांद्रे आणि मोरजी समुद्रकिनार्‍यांवरील क्लबमध्ये कर्कश संगीत लावणार्‍या क्लबच्या व्यवस्थापकाला नागरिकांनी खडसावले !

रात्रीच्या वेळी होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात प्रशासन काही करत नसल्याने नागरिकांना ते रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो !

E-auction announced : वेर्णा (गोवा) औद्योगिक वसाहतीमधील भूखंडांचा ई-लिलाव घोषित

गोवा औद्योगिक विकास महामंडळाने वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्‍ये उद्योग व्‍यवसायांच्‍या स्‍थापनेसाठी भूमी भाडेपट्टीवर देण्‍यासाठी हा ई-लिलाव घोषित केला आहे.

Goa PradhanMantri Divyansha Kendra : बांबोळी येथे विकलांगांसाठी देशातील पहिले दिव्यांशा केंद्र

व्हीलचेअर्स, प्रोस्थेटिक्स, श्रवणयंत्रे आणि चष्मा इत्यादी सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरती उपकरणे विकलांग व्यक्ती, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रामार्फत विनामूल्य दिली जातील. याचबरोबर बांबोळी येथील मातृछाया केंद्रात ‘स्पाइनल रिहॅब सेंटर’देखील चालू करण्यात आले.

Goa : जाधव आयोगाचा अहवाल मंत्रीमंडळाने स्वीकारला !

अहवालात दिलेल्या सूचनांची सरकार योग्य वेळी कार्यवाही करील. बनावट कागदपत्रे वापरून बळकावलेल्या आणि विकल्या गेलेल्या सरकारी अन् कुणाच्याही नावावर नसलेल्या भूमी परत घेण्याचे काम सरकार प्रथम करील.

Goa : मासाभरात ३ नद्यांमधून वाळू उत्खननास पर्यावरण संमती मिळण्याची शक्यता

इतर राज्यांतून वाळूच्या वाहतुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात आले असून प्रतिफेरी ५०० रुपये शुल्क देऊन गोव्यात वाळू आणता येईल.

Goa Tenancy Act Amendment : सार्वजनिक कारणासाठी कृषीभूमी हस्तांतरित करण्यासंंबंधी कुळ कायद्यामध्ये सुधारणा

या कायद्यामध्ये यापूर्वी शेतीविषयक किंवा शैक्षणिक कारणांसाठी भूमी हस्तांतरित करण्याविषयी ८ सूत्रे आहेत. त्यानंतर आता या २ सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथील विवेकानंद शुक्ला यांनी सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट

गाझियाबाद येथे उत्तरप्रदेश राज्य कर सहआयुक्त (जी.एस्.टी.) म्हणून कार्यरत असलेले श्री. विवेकानंद शुक्ला यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

Sanjivani Farmers Call Off Goa : मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलन मागे !

यांत्रिक समस्या, यंत्रांच्या सुट्या भागांची अनुपलब्धता आणि स्थानिक उसाचा तुटवडा या कारणांमुळे सरकारने वर्ष २०१९-२०२० मध्ये कारखाना बंद केला होता.

Goa Legislators Day : म्हादईच्या रक्षणासाठी सरकार वचनबद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हादई नदीच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘म्हादई ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. सरकार सातत्याने केंद्र सरकारकडे हे सूत्र उचलून धरत असून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सक्षमपणे लढत आहे.’

Goa Power Hikes : गोव्यात वीज दरवाढीविषयी जनसुनावणी – ग्राहकांचा तीव्र विरोध

नवीन वीजदर वीजनियमन आयोगाकडून संमत झाल्यास १ एप्रिल २०२४ पासून नवीन वीजदर लागू करण्यात येतील.