वर्षभरात सरकारी खात्यातील २ सहस्र ५०० रिक्त पदे भरणार ! – मुख्यमंत्री सावंत

राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या वतीने येत्या वर्षभरात सरकारी खात्यांमधील २ सहस्र ५०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे खाजन भूमीच्या संरक्षणासाठी ‘खाजन विकास आणि संवर्धन मंडळ’ स्थापन करण्यात येईल..

‘नाईट पार्ट्यां’च्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला, अन्यथा उच्च न्यायालयाच्या दारात बसून आंदोलन करू !

नागरिकांवर अशी पाळी आणणारे पोलीस आणि प्रशासन काय कामाचे ?

गोव्यात बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांचा वावर

गोव्यात बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांचा वावर चालू आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी हल्लीच भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतली असता ही गोष्ट उघडकीस आली आहे.

कोलवा येथे कायद्याचे उल्लंघन करून बांधलेला बंगला पाडला

हे बांधकाम देहलीतील व्यावसायिक पवनकुमार अरोरा यांनी केले होते. या वेळी सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर उपस्थित होते.

होंडा, सुळकर्णा आणि कोडली येथील खाण क्षेत्रांचा ऑनलाईन लिलाव घोषित

सर्वाेच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट या दिवशी एका निवाड्याद्वारे पूर्वी साठवणूक करून ठेवलेल्या खनिज मालाची निविदा काढण्यास गोवा सरकारला अनुमती दिली आहे.

गोव्यात स्वातंत्र्यदिनाच्या सुटीच्या कालावधीत २३ ट्रान्स पार्ट्यांचे आयोजन

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय केवळ पोकळ आश्वासने देत असल्याने हणजूण आणि वागातोर येथील ग्रामस्थांनी आता या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्वातंत्र्यदिनी हणजूण पोलीस ठाण्याच्या समोर मेणबत्ती घेऊन निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

डोंगर कापणी आणि भराव घालवणे या प्रकारांवर २४ घंटे लक्ष ठेवण्याचा तलाठ्यांना आदेश

राज्यातील डोंगर कापणी आणि भराव घालणे, या प्रकारांवर २४ घंटे लक्ष ठेवण्याबरोबरच त्यासंदर्भात अहवाल देणे, तसेच शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही निरीक्षण करण्याची सूचना तलाठ्यांना करण्यात आली आहे.

वेर्णा (गोवा) पठारावर ‘सनबर्न’चे आयोजन करण्यास लोटली ग्रामसभेत विरोध

ग्रामसभेत ‘सनबर्न’चे आयोजन, कचरा प्रकल्प आणि रोमी लिपी यांसंबंधी प्रश्न हाताळण्यात येणार असल्याने ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून ३ बांगलादेशी नागरिक पसार

केंद्राच्या छताचे पत्रे उचकटून संरक्षक भिंतीवरून उडी मारून ते पसार झाले. या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.