‘म्हादई प्रवाह’च्या दुसर्‍या बैठकीत म्हादई नदीचे निरीक्षण केल्याच्या सूत्राचा उल्लेख नाही

या बैठकीत कर्नाटकने म्हादईसंबंधी महाराष्ट्राच्या प्रस्तावाला घेतलेल्या आक्षेपांचा उल्लेख आहे; मात्र म्हादई आणि गोवा यासंबंधी एकाही सूत्राचा उल्लेख नाही.

अमली पदार्थांच्या व्यवसायात गाेमंतकियांचा वाढता सहभाग

चालू वर्षाच्या ६ मासांच्या अहवालानुसार अमली पदार्थ व्यवसायाशी निगडीत कह्यात घेतलेल्यांमध्ये ४२ टक्के  गोमंतकीय नागरिक आहेत. ही आकडेवारी गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ८० टक्के अधिक आहे.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनातून आतापर्यंत २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे.

मुरगाव येथील १२५ व्या श्री दामोदर भजनी सप्ताहाला उत्साहात प्रारंभ !

११ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गोपाळकाला होईल आणि त्यानंतर दुपारी १२.३० वाजता भजनी सप्ताहाची समाप्ती होईल. या निमित्ताने सनातन संस्थेने येथील स्वातंत्र्य मार्गावरील हॉटेल लापाझ गार्डनसमोर सनातनच्या ग्रंथांचा कक्ष उभारला आहे.

पतंग उडवण्यासाठी कृत्रिमरित्या सिद्ध करण्यात येणार्‍या धाग्यांवर गोव्यात बंदी

पंतग उडवण्यासाठी नॉयलॉन, प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम पदार्थांपासून बनवलेल्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठवणूक, पुरवठा आणि आयात करण्यास बंदी असल्याविषयीची अधिसूचना गोवा सरकारने जारी केली आहे.

यापुढे ‘शिधापत्रिका’ ही निवासस्थान किंवा ओळख यांविषयीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही

सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) २०१५ नुसार दिलेल्या शिधापत्रिकेचा उपयोग निवासस्थान किंवा ओळख यांविषयीचा पुरावा म्हणून करण्यास ग्राह्य धरला जाणार नाही, अशी सूचना नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडून देण्यात आली आहे.

कळंगुट येथील अन्य अनधिकृत डान्सबारचे बांधकाम तोडण्याची याचिकेद्वारे नागरिकांची मागणी

कळंगुट पंचायतीने नुकतेच बागा येथील अनधिकृत डान्स बारचे बांधकाम भूईसपाट केले आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २७ उपाहारगृहे बंद करण्याचा आदेश

२७ उपाहारगृहे आवश्यक अनुज्ञप्ती न घेता कार्यरत आहेत, हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या लक्षात का येत नाही ? कुणीतरी न्यायालयात गेल्यावर कारवाई करणारे प्रशासन काय कामाचे ?

गोव्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना होणार

९ ऑगस्टला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. या बैठकीत वायनाड येथील दुर्घटनेवरून राज्याचे पुनरावलोकन करण्यात आले.

‘किनार्‍यांवरील ‘शॅक’ उभारणी (नियमन आणि नियंत्रण) विधेयक २०२४’ला विधानसभेत मान्यता

गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अनुमतीनंतर आता राज्यातील समुद्रकिनार्‍यांवर हंगामी ‘शॅक उभारणीसाठी बांधकाम अनुज्ञप्ती (परवाना) किंवा कोणत्याही तांत्रिक मान्यतेची आवश्यकता भासणार नाही.