मडगाव, १३ ऑगस्ट (वार्ता.) – कोलवा समुद्र किनार्यानजीक गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन (सीआर्झेड) कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात आलेला बंगला १३ ऑगस्टला प्रशासनाने पाडला. हे बांधकाम देहलीतील व्यावसायिक पवनकुमार अरोरा यांनी केले होते. या वेळी सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर उपस्थित होते. हे बांधकाम पाडण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर पाडण्यात आल्याची माहिती मामलेदार प्रतापराव गावकर यांनी माध्यमांना दिली. हा बंगला सीआर्झेड नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आला असल्याची याचिका कोलवा नागरी मंचचे ज्युडीथ आल्मेदा यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली होती. (एका नागरिकाला लक्षात येते, ते तेथील प्रशासनाला का लक्षात येत नाही ? – संपादक) त्यानंतर न्यायालयाने किनारपट्टी प्राधिकरणाला या प्रकरणी सुनावणी घेण्यास सांगितले होते. किनारपट्टी प्राधिकरणाच्या सुनावणीत बांधकाम भरती रेषेच्या २०० मीटर आत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर हे बांधकाम पाडण्याचा आदेश देण्यात आला होता.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > कोलवा येथे कायद्याचे उल्लंघन करून बांधलेला बंगला पाडला
कोलवा येथे कायद्याचे उल्लंघन करून बांधलेला बंगला पाडला
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !