धर्मांधतेला देण्यात येणारे प्रोत्साहन जाणा !

कर्नाटकातील एका महाविद्यालयामध्ये हिंदु विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत बुरखा घालून आलेल्या एका विद्यार्थिनीचा वैध मार्गाने विरोध केला असता तिने ‘अल्ला हू अकबर’ म्हणत विरोध केला. त्यामुळे तिला इस्लामी संस्था ५ लाख रुपये देणार आहे.

धर्मांध विद्यार्थिनींची कट्टरता जाणा !

धर्मांध विद्यार्थिनींची कट्टरता जाणा !

उडुपी (कर्नाटक) येथील महाविद्यालयामध्ये हिजाब घालून येण्याच्या मुसलमान विद्यार्थिनींच्या मागणीला हिंदु विद्यार्थ्यांकडून भगवे उपरणे घालून विरोध करण्यात येत आहे. या वेळी विद्यार्थिनी ‘अल्ला हू अकबर’च्या तर हिंदु विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.

‘ह्युंदाई’ आणि ‘किआ’ आस्थापनांवर बहिष्कारच हवा !

‘ह्युंदाई’ आणि ‘किआ’ आस्थापनांवर बहिष्कारच हवा !

‘ह्युंदाई’ आणि ‘किआ’ या दक्षिण कोरियातील चारचाकी वाहन निर्मिती आस्थापनांच्या पाकिस्तानमधील फेसबूक आणि ट्विटर खात्यांवरून पाकिस्तानच्या बाजूने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांच्या कथित स्वातंत्र्य आंदोलनाचे समर्थन केले.

धर्मांधांची वासनांधता जाणा !

धर्मांधांची वासनांधता जाणा !

ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य लॉर्ड नझीर अहमद यांना ७० च्या दशकात एक अल्पवयीन मुलगी आणि मुलगा यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

यावर भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

यावर भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

फ्रान्समध्ये वाढत चालेल्या इस्लामी धर्मांधतेविषयीची माहिती वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात दाखवल्यावरून ‘कॅनाल प्लस’ या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार ओफेली मेयुनीर यांना धमक्या देण्यात येत आहेत.

ही लोकशाहीची शोकांतिका नव्हे का ? 

ही लोकशाहीची शोकांतिका नव्हे का ? 

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये समाजवादी पक्षाने ७५ टक्के, राष्ट्रीय लोकदलाने ५९, भाजपने ५१, काँग्रेसने ३६, बसपने ३४, तर ‘आप’ने १५ टक्के गुन्हे नोंद असणार्‍यांना उमेदवारी दिली आहे.

ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस !

ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस !

मी हिंदु असल्याने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या स्पर्धेतून बाहेर फेकलो गेलो, असे विधान पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड यांनी केले आहे. पंजाब शीखबहुल राज्य आहे. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून लवकरच नाव घोषित करण्यात येणार आहे.

पाकमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

पाकमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

पाकिस्तानच्या डहारकी शहरापासून २ किलोमीटर अंतरावर सुतान लाल देवान या हिंदु व्यापार्‍याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. सुतान यांना ‘जिवंत रहायचे असेल, तर भारतात निघून जा’ अशा धमक्या दिल्या जात होत्या.

झोपलेले रेल्वे प्रशासन !

झोपलेले रेल्वे प्रशासन !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांती कक्षाला प्रार्थनास्थळ बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे.

देशातील प्रत्येक गावात गोशाळा हवी !

देशातील प्रत्येक गावात गोशाळा हवी !

प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा उभारली, तरी पुरणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरच नव्हे, तर ग्राम पातळीवरही गोशाळा निर्माण केल्या पाहिजेत, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.