तमिळनाडू सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

तमिळनाडू सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

तमिळनाडूतील कॉन्व्हेंट शाळेतील १२ वीची विद्यार्थिनी लावण्या हिचा धर्मांतरासाठी छळ करण्यात आल्याने तिने आत्महत्या केली. या घटनेच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला तमिळनाडूतील द्रमुक सरकारने नकार दिला.

हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केली, तर चुकीचे कसे ?

हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केली, तर चुकीचे कसे ?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना २८ गव्हर्नरांचे (राज्यांच्या प्रमुखांचे) समर्थनही मिळाले आहे. ट्रम्प यांना ‘ख्रिस्ती अमेरिकींचा नायक’ संबोधले जात आहे.

भारतात जीनाच्या नावाने टॉवर कशाला ?

भारतात जीनाच्या नावाने टॉवर कशाला ?

गुंटूर (आंधप्रदेश) येथे जमावबंदीचे उल्लंघन करत महंमद अली जीना टॉवर येथे प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी ‘हिंदु वाहिनी’ संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

अल्पसंख्य हे बहुसंख्य झाल्यावरची स्थिती जाणा !

अल्पसंख्य हे बहुसंख्य झाल्यावरची स्थिती जाणा !

‘शामली जिल्ह्यामध्ये तुम्ही जाट लोक केवळ २४ सहस्र आहात आणि आम्ही ९० सहस्र आहोत’, अशी धमकी देणारा धर्मांधांचा एक व्हिडिओ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांनी ट्वीट केला आहे.

काँग्रेसवाल्याचे पाकप्रेम जाणा !

काँग्रेसवाल्याचे पाकप्रेम जाणा !

‘नवज्योत सिद्धू यांना मंत्रीमंडळात एकदा स्थान द्या’, अशा प्रकारचा संदेश मला पाकिस्तानातून आला होता, असा गौप्यस्फोट पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केला आहे.

समाजवादी पक्षाचे पाकप्रेम जाणा !

समाजवादी पक्षाचे पाकप्रेम जाणा !

भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही, तर चीन आहे. भाजप मात्र सातत्याने पाकला लक्ष्य करतो, असे विधान समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे.

धर्मांध माजी पोलीस महासंचालकांचा हिंदुद्वेष जाणा !

धर्मांध माजी पोलीस महासंचालकांचा हिंदुद्वेष जाणा !

हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिल्यास आम्ही अशी स्थिती निर्माण करू की, ती सांभाळणे कठीण होईल, अशी धमकी पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंह सिद्धू यांचे सल्लागार महंमद मुस्तफा यांनी दिली.

हा ‘थडगी जिहाद’ रोखा !

हा ‘थडगी जिहाद’ रोखा !

यमुना खादर भागामध्ये अनधिकृतपणे थडगी उभारण्यात आली आहेत. जेथे एक वीटही बसवणे अवैध आहे, त्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर विविध थडगी बांधण्यात येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.

वासनांध पाद्र्यांना माजी पोप यांनी पाठीशी घातले, हे जाणा !

वासनांध पाद्र्यांना माजी पोप यांनी पाठीशी घातले, हे जाणा !

जर्मनीतील एका विधी आस्थापनाने माजी पोप बेनेडिक्ट यांच्यावर लैंगिक शोषणाच्या ४ प्रकरणांत संबंधितांवर योग्य कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. ही प्रकरणे वर्ष १९७० ते १९८० या काळातील आहेत.

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथील श्री षण्गुमुगम्देवी मंदिरातील देवीचे दागिने सरकारच्या त्रावणकोर देवस्वम् मंडळाच्या अधिकार्‍यांनी चोरल्याचे उघडकीस आले आहे.