#Diwali : यमदीपदानाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी जाणून घ्या !

यमदीपदान पूजाविधी

सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी दिला आहे.


यमदीपदान पूजाविधी – चलच्चित्रपट (Videos) पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.hindujagruti.org/hindi/s/156.html


यमदीपदान

आचमन

पुढील ३ नावे उच्चारल्यावर प्रत्येक नावाच्या शेवटी डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन प्यावे.

श्री केशवाय नमः । श्री नारायणाय नमः । श्री माधवाय नमः ।

‘श्री गोविन्दाय नमः ।’ या नावाने हातावर पाणी घेऊन खाली ताम्हणात सोडावे.

त्यानंतर पुढील नावे अनुक्रमे उच्चारावीत –

विष्णवे नमः । मधुसूदनाय नमः । त्रिविक्रमाय नमः । वामनाय नमः । श्रीधराय नमः । हृषीकेशाय नमः । पद्मनाभाय नमः । दामोदराय नमः । संकर्षणाय नमः । वासुदेवाय नमः । प्रद्युम्नाय नमः । अनिरुद्धाय नमः । पुरुषोत्तमाय नमः । अधोक्षजाय नमः । नारसिंहाय नमः । अच्युताय नमः । जनार्दनाय नमः । उपेन्द्राय नमः । हरये नमः । श्रीकृष्णाय नमः ।

(हात जोडावे.)

प्रार्थना

श्रीमन्महागणाधिपतये नमः ।
(गणांचा नायक असलेल्या अशा श्री गणपतीला मी नमस्कार करतो.)

इष्टदेवताभ्यो नमः ।
(माझ्या आराध्य देवतेला मी नमस्कार करतो.)

कुलदेवताभ्यो नमः ।
(कुलदेवतेला मी नमस्कार करतो.)

ग्रामदेवताभ्यो नमः ।
(ग्रामदेवतेला मी नमस्कार करतो.)

स्थानदेवताभ्यो नमः ।
(येथील स्थानदेवतेला मी नमस्कार करतो.)

वास्तुदेवताभ्यो नमः ।
(येथील वास्तुदेवतेला मी नमस्कार करतो.)

आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः ।
(सूर्यादी नऊ ग्रहदेवतांना मी नमस्कार करतो.)

सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ।
(सर्व देवांना मी नमस्कार करतो.)

सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।
(सर्व ब्राह्मणांना (ब्रह्म जाणणार्‍यांना) मी नमस्कार करतो.)

अविघ्नमस्तु ।
(सर्व संकटांचा नाश होवो.)

देशकाल

आपल्या डोळ्यांना पाणी लावून पुढील देशकाल म्हणावा.

यमद्वितीयेला यमदीपदान पूजाविधी करतांना पुढील देशकालाचा उच्चार करावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलि प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन्वर्तमाने व्यावहारिके शुभकृत् नाम संवत्सरे, दक्षिणायने, शरदऋतौ, आश्विन मासे, कृष्ण पक्षे, अमायांतिथौ (१७.२८ नंतर), सोम वासरे, चित्रा दिवस नक्षत्रे, विष्कम्भ योगे, चतुष्पाद करणे, कन्या स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे (२६.३३ नंतर तुला), तुला स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, मीन स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, मकर स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ, शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवं ग्रहगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…..
(महापुरुष भगवान श्रीविष्णूंच्या आज्ञेने प्रेरित झालेल्या या ब्रह्मदेवाच्या दुसर्‍या परार्धामधील विष्णुपदातील श्रीश्वेत-वराह कल्पामधील वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या युगातील चतुर्युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणातील आर्यावर्त देशातील (जम्बुद्वीपावरील भरतवर्षामध्ये भरत खंडामध्ये दंडकारण्य देशामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तटावर बौद्ध अवतारात रामक्षेत्रात) सध्या चालू असलेल्या शालिवाहन शकातील व्यावहारिक शुभकृत् नावाच्या संवत्सरातील (वर्षातील) दक्षिणायनातील शरद ऋतूतील आश्विन मासातील (महिन्यातील) कृष्ण पक्षातील अमावास्येला (टीप २) विष्कम्भ योगातील शुभघडीला, म्हणजे वरील गुणविशेषांनी युक्त शुभ आणि पुण्यकारक अशा तिथीला)

त्रयोदशी या दिवशी यमदीपदान पूजाविधी करतांना पुढील देशकालाचा उच्चार करावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलि प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन्वर्तमाने व्यावहारिके शुभकृत् नाम संवत्सरे, दक्षिणायने, शरदऋतौ, आश्विन मासे, कृष्ण पक्षे, त्रयोदश्यांतिथौ (१८.०३ नंतर), शनि वासरे, उत्तरा दिवस नक्षत्रे, ऐन्द्र योगे, गरज करणे, सिंह स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे (२०.०५ नंतर कन्या), तुला स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, मीन स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, मकर स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ, शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवं ग्रह गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ …
(महापुरुष भगवान श्रीविष्णूंच्या आज्ञेने प्रेरित झालेल्या या ब्रह्मदेवाच्या दुसर्‍या परार्धामधील विष्णुपदातील श्रीश्वेत-वराह कल्पामधील वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या युगातील चतुर्युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणातील आर्यावर्त देशातील (जम्बुद्वीपावरील भरतवर्षामध्ये भरत खंडामध्ये दंडकारण्य देशामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तटावर बौद्ध अवतारात रामक्षेत्रात) सध्या चालू असलेल्या शालिवाहन शकातील व्यावहारिक शुभकृत् नावाच्या संवत्सरातील (वर्षातील) दक्षिणायनातील शरद ऋतूतील आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील आजच्या त्रयोदशी तिथीला उत्तरा नक्षत्रातील (टीप २) ऐन्द्र योगातील शुभघडीला, म्हणजे वरील गुणविशेषांनी युक्त शुभ आणि पुण्यकारक अशा तिथीला)

संकल्प

उजव्या हातात अक्षता घेऊन पुढील संकल्प म्हणावा.

मम आत्मनः परमेश्वर-आज्ञारूप-सकलशास्त्र-श्रुतिस्मृति-पुराणोक्त-फलप्राप्तिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मम अपमृत्यु-विनाशार्थं यमदीपदानं करिष्ये ।

(‘करिष्ये’ म्हटल्यावर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हातावरून खाली सोडावे.)

अर्थ : मला स्वतःला परमेश्वराची आज्ञास्वरूप असलेल्या सर्व शास्त्र-श्रुति-स्मृति- पुराणातील फळ मिळवून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मला येणार्‍या अपमृत्यूचा नाश व्हावा; म्हणून मी यमदेवाला दीपदान करतो.

कृती

कणकेचा दिवा करावा. त्यात तिळाचे तेल घालून तो प्रज्वलित करून घराच्या बाहेर दक्षिण दिशेला वात करून ठेवावा आणि खालील मंत्रांनी गंध, फूल आणि हळद-कुंकू वहावे.

श्री दीपदेवताभ्यो नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।
श्री दीपदेवताभ्यो नमः । पुष्पं समर्पयामि ।
श्री दीपदेवताभ्यो नमः । हरिद्रां समर्पयामि ।
श्री दीपदेवताभ्यो नमः । कुङ्कुमं समर्पयामि ।

त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून उभे रहावे आणि हात जोडून खालील मंत्र म्हणावा. (हा मंत्र केवळ त्रयोदशीच्या दिवशी म्हणावा.)

मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

अर्थ : त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा, काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे.

अनेन दीपदानेन श्री यमः प्रीयताम् ।

(या दीपदानाने यमदेव प्रसन्न होवो.)
(असे म्हणून उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे आणि दोन वेळा आचमन करावे.)

टीप १ – येथे देशकाल लिहितांना संपूर्ण भारत देशाला अनुसरून ‘आर्यावर्तदेशे’ असा उल्लेख केला आहे. ज्यांना ‘जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः …’ अशा प्रकारे स्थानानुसार अचूक देशकाल ठाऊक असेल, त्यांनी त्यानुसार योग्य तो देशकाल म्हणावा.
टीप २ – वरील देशकाल २०२२ ला अनुसरून येथे दिला आहे.

दिवाळीविषयीचे लघुपट पहा !

(सौजन्य : परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारी ‘सनातन संस्था’

#दिवाळी #diwali diwali दिवाळी #दिवाळी२०२२ #diwali2022 diwali2022 दिवाळी २०२२ #दीपावली #deepawali deepawali दीपावली #दीपावली२०२२ #deepawali2022 deepawali2022 दीपावली २०२२ #दीप #deep deep दीप #लक्ष्मीपूजन #lakshmipoojan #laxmipoojan lakshmipoojan laxmipoojan लक्ष्मीपूजन #आकाशकंदील #akashkandil akashkandil आकाशकंदील #नरकचतुर्दशी #narakchaturdashi narakchaturdashi नरकचतुर्दशी #पाडवा #padwa padwa पाडवा #भाऊबीज #bhaubeej bhaubeej भाऊबीज #भाईदूज #bhaidooj भाईदूज bhaidooj #भाईदूज२०२२ #bhaidooj2022 bhaidooj2022 भाईदूज२०२२ #भाऊबीज२०२२ #bhaubeej2022 भाऊबीज२०२२ bhaubeej2022