शेअर बाजारात येणारे महावितरण देशातील पहिले वीज आस्थापन ठरेल ! – देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रात ‘ऊर्जा क्रांती’ची घोषणा !

शिवरायांविरुद्ध लिहिणार्‍या पंडित नेहरूंचा मविआ निषेध करणार का ?

छत्रपतींच्या विरोधात सर्वाधिक लिहिणार्‍या नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. त्यांचा निषेध करण्याची हिंमत महाविकास आघाडी दाखवणार का ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ मार्चला विधान परिषदेच्या सभागृहात केला.

प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार ! – मुख्यमंत्री

विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे ‘स्मार्ट प्री-पेड वीज मीटर’विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.

‘छावा’ चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित केला ! – मुख्यमंत्री फडणवीस

नरिमन पॉईंट येथील ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य, मंत्री यांच्यासाठी आयोजित ‘छावा’ चित्रपटाच्या खेळाच्या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्रात रहाणार्‍यांना मराठी आलीच पाहिजे ! – देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांच्या मराठीविषयीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडली भूमिका !

महाराष्ट्र : ५ वर्षांत २ सहस्र ७६४ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई होऊनही घुसखोरी थांबेना !

देशभरात ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर असून एकूण आकडा पहाता ही आकडेवारी ०.००५ टक्के आहे. याने घुसखोरीला लगाम कसा लागू शकेल ?

Maharashtra Budget Session 2025 : हिंगोलीत शासकीय कर्मचार्‍यांवर आक्रमणाच्या १५ घटना !

हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षात शासकीय कर्मचार्‍यांवरील आक्रमणाच्या १५ घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, यासंदर्भात आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी तारांकित लेखी प्रश्न उपस्थित केला होता.

Maharashtra Budget Session 2025 : विधानसभेत महायुतीचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांच्यात वादावादी !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री. भैय्याजी जोशी यांनी मराठीविषयी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यशासनाची भूमिका स्पष्ट केली.

लाडकी बहीण योजनेंर्तगत मुख्यमंत्र्यांनी ‘येत्या अर्थसंकल्पापासून २ सहस्र १०० रुपये देऊ’, असे म्हटलेले नाही ! – आदिती तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात २ सहस्र १०० रुपये देऊ’, असे म्हटलेले केलेले नाही. राज्य सरकारकडून योजना घोषित केली जाते; पण (निवडणुकीतील) घोषणापत्र ५ वर्षांसाठी असते.

चौथी मुंबई वाढवण बंदराजवळ होईल ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाढवण बंदर हे जे.एन्.पी.टी.पेक्षा तीनपट मोठे आहे. तेथे आणखी एक विमानतळ करणार आहोत. तेथे बुलेट ट्रेनही असेल.