आरोपींना अटक केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षात शासकीय कर्मचार्यांवरील आक्रमणाच्या १५ घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, यासंदर्भात आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी तारांकित लेखी प्रश्न उपस्थित केला होता.
यामध्ये सातव यांनी म्हटले आहे की, या आक्रमणामध्ये कृषी पर्यवेक्षक आणि तलाठी यांचा मृत्यू झाला, तसेच सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी ते लिंबाळा रस्त्यावर अवैध रेती प्रकरणात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील तलाठ्याच्या अंगावर टिप्पर घालून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शासनाने काय कारवाई केली ?कर्मचार्यांवर होणारी आक्रमणे रोखण्याविषयी काय उपाययोजना काढल्या ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, या प्रकरणांची चौकशी करून संबंधित आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. काही आरोपींना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. अशा प्रकारे सरकारी कर्मचार्यांवर आक्रमणाच्या घटना घडू नयेत, ासाठी वाळू चोरांवर कारवाया करतांना महसूल विभागाने पोलीस बंदोबस्त घेण्याविषयी जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवले आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्यांमधील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहेत.