
मुंबई – राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या ‘प्रीपेड वीज मीटर’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता ‘इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली’ बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे ‘स्मार्ट प्री-पेड वीज मीटर’विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचे काम चालू आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणार्या ग्राहकांना वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच सहा मासांच्या कालावधीत हा पालट अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे. लवकरच राज्यभरात ‘इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टम’ कार्यान्वित करण्यात येईल.’’