पाकिस्तानी हिंदूही आता त्यांच्या नातेवाइकांच्या अस्थी भारतातील पवित्र गंगेत विसर्जित करू शकणार !

पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट केला आहे.

तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदनातून उघड !

तरुणीच्या करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या नातेवाइकांनी ती शेवटी विवस्त्र सापडल्याने या संदर्भात संशय व्यक्त केला होता.

मंत्र्यांच्या विधानांसाठी सरकार नाही, तर स्वतः मंत्रीच उत्तरदायी ! – सर्वाेच्च न्यायालय

कोणत्याही मंत्र्याच्या विधानासाठी सरकारला उत्तरदायी धरता येत नाही. यासाठी मंत्रीच उत्तरदायी असतात. यासंबंधी राज्यघटनेतील अनुच्छेद १९(२) मध्ये पूर्वीपासूनच योग्य ती तरतूद अस्तित्वात आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींच्या भाषणस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यास नकार दिला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ सैन्याधिकार्‍यांना लाचखोरीसाठी अटक केल्याचे वृत्त बनावट आणि दिशाभूल करणारे ! – सैन्यदल

अशी खोटी वृत्ते प्रसारित करून भारतीय सैन्याची प्रतिमा मलिन करणार्‍या वृत्तपत्रावर कारवाई करा !

६३३ भारतीय बंदीवानांना मुक्त करा !

भारताने पाकिस्तानला त्याच्या कारागृहातील शिक्षा पूर्ण झालेले भारतीय आणि ज्यांचे नागरिकत्व भारतीय असल्याची निश्‍चिती झाली आहे, अशांची मुक्तता करण्याचे आवाहन केले आहे.

देहलीमध्ये चारचाकी गाडीने तरुणीला धडक देऊन १२ किलोमीटर फरफरटत नेल्याने तिचा मृत्यू

कांझावाला भागात ३१ डिसेंबरच्या रात्री एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील तरुणी गाडीच्या खाली आली आणि तिला तसेच १२ किलोमीटर फरफटत नेण्यात आले.या अपघातात तिचा मृत्यू झाला.

४२ दिवसांत बेपत्ता असणार्‍या २१ बेपत्ता मुलांना शोधून काढणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍याचे सर्वत्र कौतुक !

यापूर्वीही देहली येथील समयपूर बदली पोलीस ठाण्यात मुख्य हवालदार म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अडीच मासात ७६ बेपत्ता मुलांना शोधून काढले होते.

विषारी दारूच्या प्रकरणाच्या सूत्रधाराला देहलीतून अटक

रामबाबू याने रसायनमिश्रित दारू बनवल्यामुळे ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. रामबाबू याच्या अटकेविषयी देहली पोलिसांनी बिहार पोलिसांना माहिती दिली आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील औषध आस्थापनावर धाड

उझबेकिस्तानमध्ये भारतीय आस्थापनाचे कफ सिरप घेतल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा तेथील सरकारने केला होता. त्यानंतर केंद्रशासनाच्या विविध संस्था आणि उत्तरप्रदेशचा अन्न आणि औषध विभाग यांच्या एका पथकाने नोएडा येथील आस्थापनाच्या कार्यालयात धाड टाकली.

पाकने त्याच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करावे ! – भारत

केवळ असे सांगून पाक तेथील हिंदूंचे रक्षण करणार नाही. गेली ७५ वर्षे पाकने तेथील हिंदूंचे संरक्षण केलेले नाही. पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत आहे. त्यामुळे भारताने याकडे आता युद्धपातळीवर लक्ष घालणे आवश्यक आहे. केवळ पाकच नव्हे, तर बांगलादेशातील हिंदूंकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.