जन्मापूर्वीच हिंदु दांपत्याच्या मुलीला मुसलमान दांपत्याला दत्तक देण्याची मागणी कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली !

या पालकांनी दत्तक देण्याच्या नावाखाली मुलीची पैशांसाठी विक्रीच केली आहे, हे सहन करण्यापलीकडचे आहे.

राजकीय सोयीसाठी आतंकवाद्यांचे ‘चांगले किंवा वाईट’, असे वर्गीकरण करण्याचे युग संपले पाहिजे !

आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.

रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे डॉक्टर तरुणीचे १०० जणांनी घरात घुसून केले अपहरण !

एका डॉक्टर तरुणीचे अशा प्रकारे अपहरण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे कि नाही ?

बलात्काराच्या प्रकरणी केरळमधील सत्ताधारी माकपच्या युवा नेत्याला अटक

साम्यवाद्यांचा बरबटलेला इतिहास पहाता साम्यवादी केरळ सरकारकडून अशांवर कारवाई होणे दुरापस्तच होय !

हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !

आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.

उत्तरप्रदेशातील मुसलमान पोलीस जिहादी झाकीर नाईक याचे समर्थन करणार्‍या फेसबुकच्या गटात !

‘पोलीस दलातील कर्मचारी काय करत आहेत ?’, हे पोलिसांना ठाऊक नसेल,तर कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहू शकेल का ? अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

सर्व धर्मियांसाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !

‘आपल्या नागरिकांचे कल्याण आणि हित जपणे हे राज्याचे मुख्य कर्तव्य असते आणि त्यात धर्माला स्थान नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण कसे नाही ? त्यांची संख्या लाखोंच्या घरात जाईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ?

नक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यशासनाचा अनुवादाचा पुरस्कार !

सातत्याने नक्षलवादी आणि माओवादी यांच्याकडून जनता, पोलीस अन् सैनिक यांच्या हत्या, होत असतांना नक्षलवाद्यांचे समर्थक कोबाड गांधी यांना पुरस्कार देणे हे लज्जास्पद आहे.

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा बनवण्यासाठी अन्य राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘लव्ह जिहाद’ कायदा संमत झाल्यानंतर महाराष्ट्रातील ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे रोखण्यास आणि त्यावर प्रतिबंध घालण्यास साहाय्य होईल’,असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.