सर्व धर्मियांसाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !

केरळ उच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला सल्ला !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केंद्रशासनाने सर्व धर्मियांसाठी समान नागरी कायदा (युनिफॉर्म सिविल कोड) बनवण्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे केरळ उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना सांगितले. ‘भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. देशात समान नागरी कायदा नसल्याने विवाहाच्या संदर्भात धर्मानुसार सर्वांना वेगवेगळे कायदे आहेत’, असेही न्यायालयाने म्हटले.

‘आपल्या नागरिकांचे कल्याण आणि हित जपणे हे राज्याचे मुख्य कर्तव्य असते आणि त्यात धर्माला स्थान नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका ख्रिस्ती दांपत्याने प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली.