आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यांसाठी साधना !

रामराज्य येण्यापूर्वी  रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे.

नामस्मरणाचे महत्त्व सांगणारी सुवचने

अडचणी असल्या तरी नाम घेता येते; म्हणून नामस्मरण न करण्याविषयी सबबी सांगू नका. सबब सांगितली की, त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो.

नामजपाप्रती दृढ श्रद्धा आणि गुरुदेवांप्रती भाव असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची अयोध्या येथील कु. आनंदिता श्रीवास्तव (वय १० वर्षे) !

एकदा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आनंदिताला तिच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्णाचे बालरूपातील एक चित्र दिले होते. आनंदिता नेहमी चित्रातील श्रीकृष्णाशी बोलते. ती रात्री झोपतांना ते छायाचित्र समवेत ठेवते.

कोल्हापूर येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. कृष्णराज प्रतीक ठोमके (वय १ वर्ष ५ मास) !

ब्रह्मोत्सव पहातांना आणि यज्ञातील दुर्गासप्तशतीचे मंत्र चालू असतांना कृष्णराज एकटक बघत हुंकार देत होता.

सनातनचे १२८ वे संतपद प्राप्त करणार्‍या कै. पू. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल (वय ८२ वर्षे) यांची कोची (केरळ) येथील सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कैमलकाकूंचा परात्पर गुरु डॉ. आठवले, ईश्वर आणि संत यांच्या प्रति पुष्कळ भाव होता. संतांनी काही सांगितल्यावर त्या त्याचे तंतोतंत आज्ञापालन करायच्या.

सनातनचे १२८ वे संतपद प्राप्त करणार्‍या कै. पू. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल (वय ८२ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

अनेक वर्षांपासून आजी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून नामजप करायच्या. उतारवयात आश्रमजीवन अंगीकारूनही अनेक गुणांमुळे त्या सेवाकेंद्रातील जीवनात समरस झाल्या होत्या.

संतांनी सांगितलेला नामजप आणि शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर घराच्या विक्रीच्या प्रक्रियेत येणारी अडचण दूर होणे

‘आमचे पुण्यातील घर विकायचे होते. घराच्या विक्रीच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात सोसायटीकडून ‘ना हरकत’ दाखला मिळण्यास पुष्कळ विलंब होऊन अडचणी येत होत्या. त्या वेळी ‘सद्गुरु सत्यवान कदम यांना विक्रीच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यासाठी नामजप विचारावा’, असे देवाने मला सुचवले…

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून साधिकेला होत असलेल्या त्रासाविषयी जाणून संबंधित ठिकाणी न्यास करून नामजप करायला सांगणे

माझे जेवण झाल्यावर आणि पोट भरलेले असूनही मला काही ना काही खावेसे वाटत असे. मला काही वेळा संयम ठेवता न आल्याने मी खात होते. असे २ – ३ वेळा झाल्यावर, ‘हा आध्यात्मिक त्रासाचा भाग वाटून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या त्रासासाठी नामजपादी उपाय विचारले…

गुरुकृपा आणि नामजपादी उपाय यांद्वारे स्वतःच्या शारीरिक त्रासांवर मात करणार्‍या सनातन आश्रम, देवद (पनवेल) येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. जयश्री साळोखे (वय ४२ वर्षे) !

सौ. जयश्री साळोखे यांना झालेले त्रास, त्यावर केलेले औषधोपचार आणि नामजपादी उपाय दिले आहेत…

भाव म्हणजे काय ?

संत नामदेव खरोखरच प्राणत्‍याग करण्‍यासाठी निघाल्‍यावर मूर्तीतून पांडुरंग अवतरित झाले. नामदेवाच्‍या भक्तीपायी देवाला प्रगट व्‍हावे लागले आणि नैवेद्य ग्रहण करावा लागला.