प्रेमळ आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असलेली ५० टक्के आध्यात्मिक पातळीची लालबाग (जिल्हा मुंबई) येथील कु. देवश्री अमेय पाटील (वय ७ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. देवश्री पाटील ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. देवश्री अमेय पाटील हिची आध्यात्मिक पातळी ५० टक्के आहे.’ – संकलक)

भाद्रपद कृष्ण तृतीया (२०.९.२०२४) या दिवशी कु. देवश्री अमेय पाटील हिचा सातवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. देवश्री अमेय पाटील हिला सातव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. देवश्री पाटील
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. प्रेमभाव

अ. ‘एकदा शाळेत देवश्रीच्या मैत्रिणीच्या गालाला लागले आणि रक्त येऊ लागले. त्या वेळी देवश्रीने स्वतःचा हातरुमाल मैत्रिणीला रक्त पुसायला दिला आणि तिला नामजप करायला सांगितला.

आ. एकदा आम्ही (मी आणि देवश्रीचे बाबा) देवश्रीच्या शाळेत गेलो होतो. तेव्हा तिच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितले, ‘‘देवश्री वर्गातील सगळ्यांना अभ्यासात साहाय्य करते. कुणी एखादी वस्तू आणली नसल्यास ती स्वतःची वस्तू त्यांना देते.

सौ. राणी पाटील

२. समंजस

देवश्री तिच्या भावंडांशी खेळत असतांना कधी वादाचा प्रसंग घडल्यास ती माघार घेते. ती कोणत्याही वस्तूसाठी हट्ट करत नाही.

३. धीट

एकदा देवश्रीने शाळेतील कार्यक्रमात झाशीच्या राणीची वेशभूषा केली होती. त्या वेळी तिचा वर्गात प्रथम क्रमांक आला होता. तेव्हा शिक्षकांनाही तिचे कौतुक वाटले.

४. मातृभाषेचा अभिमान

देवश्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असूनही ती तिच्या मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी भाषेतूनच देते. ती भ्रमणभाषवर बोलत असतांना आरंभी ‘नमस्कार’ असे म्हणते.

५. धर्माचरण करण्याची आवड

देवश्रीला वाढदिवसाच्या दिवशी केक कापायला आवडत नाही. देवश्रीला सात्त्विक रंगाचे कपडे घालायला आवडतात.

६. मोठ्या व्यक्तींप्रती आदरभाव

देवश्री मोठ्या व्यक्तींचा आदर करते. ती मोठ्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणते. ती कधीही मोठ्या व्यक्तींशी उद्धटपणे बोलत नाही किंवा त्यांना प्रत्युत्तर देत नाही.

७. नामजपादी उपायांचे गांभीर्य

अ. एकदा मी देवश्रीला विचारले, ‘‘नामजप केल्याने काय होते ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘नामजप केल्याने देव आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद मिळतो, तसेच आपल्याला त्यांचे चैतन्य मिळते.’’

आ. शाळेतील मधल्या सुटीत मुले काही वेळा मस्ती करतात. तेव्हा देवश्री बाकावर डोके ठेवून मनातल्या मनात नामजप करते.

इ. मला कधी ताण आला असेल किंवा बरे वाटत नसेल, तेव्हा ती मला कापूर-अत्तर उपाय करायला सांगते.

८. प.पू. गुरुदेवांप्रती भाव

अ. एकदा देवश्रीने खेळण्यातील घर बनवले होते. तेव्हा तिला त्या घरात सूक्ष्मातून सर्व देवता आणि प.पू. गुरुदेव यांचे दर्शन झाले.

आ. एकदा तिने आम्हाला सांगितले, ‘‘ती प्रसाधनगृहात गेली होती. त्याच्या दाराला लोहचुंबक असल्यामुळे दार आतून बंद झाले. तिने प्रसाधनगृहातील अंधार पाहून प.पू. गुरुदेवांचे स्मरण केले. तेव्हा तिला पिवळा प्रकाश दिसला आणि त्यांचे दर्शन झाले.’’

– सौ. राणी अमेय पाटील (कु. देवश्रीची आई), मुंबई. (१९.५.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck  मार्गिकेवरही पाहू शकता.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक